Sahasrakund Kavad Yatra : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शिवभक्तांनी काढली सहस्रकुंड कावड यात्रा -NNL

हिमायतनगर/उमरखेड| उमरखेड तालुक्यातील मौजे विडूळ येथील उत्तरेश्वर कावड मंडळ, भोई गल्लीतील शिवभक्त युवकांनी सहस्रकुंड पाई कावड यात्रा काढली असून, तिसऱ्या सोमवारी येथील मंदिरात स्थापन होणारी शिवपिंड या कावड यात्रेत सोबतआणली होती. या कावड यात्रेला उचलण्यासाठी ६ युवकांना परिश्रम घ्यावे लागले.

सहस्रकुंड येथून परत निघालेली कावड यात्रा दिनांक १७ रोजी हिमायतनगर शहरात दाखल झाल्यानंतर अनेक भाविकांनी कावड यात्रेच्या युवकांनी आणलेल्या भगवान शिवलिंगाचे दर्शन घेतले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या युवकांचे स्वागत केल्यानंतर कावड धारि युवकांनी येथील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन रात्रीला हिमायतनगर वाढोणा येथील श्री वरद विनायक मंदिराजवळ मुक्काम केला. परत रविवारी सकाळी हि कावड यात्रा उमरखेड विडूळ गावच्या दिशेने हर हर महादेव…. जय श्रीराम नावाच्या घोषणा देत निघाली.

या कावड यात्रेत सहभागी झालेल्या युवकांना गुरु परमेश्वर बडवे, गणेशभक्त सुवर्णकार धम्पलवार सावकार यांनी शुभेच्छा देऊन कावड यात्रेला रवाना केले. तिसऱ्या श्रावण सोमवारी कावड यात्रेतील शिवलिंगाची स्थापन करण्यात येणार असल्याचे विडूळ येथील शिवभक्त युवकांनी सांगितले. एकूणच लोखंडी फ्रेममध्ये चारही बाजूने जलकुंड आणि मधोमध भगवान शंकराची शिवपिंड हि अंदाजे दोन कुंटल वजनाची कावड यात्रा जवळपास ५० किलोमीटर दूरपर्यंत युवकांनी काढली, यात १२ ते १५ युवकांनी सहभाग घेतला हे विशेष.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button