क्राईमनांदेड

Mukhed police : मुखेड पोलीसांनी गोवंश जातीचे जनावरे पकडुन 2 लक्ष 68 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

मुखेड/नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, (Operation flush out) अंतर्गत अवैध जनावरांची वाहतुक करणारे इसमांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुखेड पोलीसांनी गोवंश जातीचे जनावरे पकडुन 2 लक्ष 68 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार पोनि लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे, पोस्टे मुखेड हद्दीत (Operation flush out) अंतर्गत कार्यवाही करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, बेटमोगरा गावाकडुन सलगारा फाटयाकडे एका पिकअप वाहनांमध्ये गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेवुन जात असल्याचे खात्रीशीर माहीती मिळाल्याने सोबत अंमलदार घेवुन सापळा लावुन थांबले असता दिनांक 06.09.2024 रोजी चे पाहाटे 05.00 वा. चे सुमारास एक पिकअप वाहन क्रमांक एमएच-26/बीई-5056 हा येत असलेला दिसला असता त्यास थांबवुन वाहन तपासणी केली.

त्या वाहनाच्या आत 08 गाय व कारवड किंमत 1,02,000 व दोन मोबाईल 16,000/- वाहन किंमत 1,50,000 असा एकुण 2,68,000/- रू चा मुद्देमाल आरोपी नामे 1) अहमद युसूफ कुरेशी, वय 27 वर्षे, व्यवसाय चालक रा. कासराळी ता. बिलोली जि. नांदेड 2) नयुम अजमुदीन कुरेशी, वय 29 वर्षे व्यवसाय जनावरे खरेदी विक्री रा. बेटमोगरा ता. मुखेड 3) मोहदु अब्दुलसाब कुरेशी रा. बेटमोगरा ता. मुखेड जि. नांदेड यांचे ताब्यातुन जप्त करून सदर जनावरे गोशाळा मुखेड येथे जमा करण्यात आले आहेत. सदर तीन आरोपी विरूध्द पोस्टे मुखेड गुरन 302/2024 हा विवीध कलमा प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देगलुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि लक्ष्मण केंद्रे, सपोउपनि पोकले, पोकों गजलवाड, होमगार्ड उत्तम कांबळे, अनिल राठोड, परमेश्वर नाईकवाड, राजेश वाघमारे यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button