नांदेडक्राईम

Police corner meeting : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कॉर्नर बैठक

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात पोलिस प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण कॉर्नर बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी उपस्थित नागरिक, उमेदवार व कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व नियम व निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही तणाव, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी.”

ही बैठक प्रभाग क्रमांक 4, 8, 11, 13 आणि 14 या भागातील नागरिक, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सुमारे 5 उमेदवारांसह 150 ते 200 कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते. यावेळी पोलिस प्रशासनाने महत्वपूर्ण सुचना दिल्या.

निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी. जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी कोणतीही कृती करू नये. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, आक्षेपार्ह वा चुकीचे संदेश प्रसारित करू नयेत. मतदानाच्या 48 तासांपूर्वीपासून ते निकालानंतरपर्यंत प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. शांततेत, पारदर्शक आणि सुव्यवस्थित निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

या बैठकीदरम्यान पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडून शहरातील सौहार्द अबाधित ठेवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button