police ; ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन पोलीस अंमलदार यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्या बदल पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पोलीस निरीक्षक रोकडे यांच्या हस्ते फित लावून पदोन्नती बहाल करून पदोन्नती प्राप्त कर्मचारी यांच्ये अभिनंदन केले आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालय येथुन पदोन्नती समितीच्या दि.2 जुलै 25 झालेल्या बैठकीच्या निर्णया नुसार पोलीस अंमलदार यांना या कार्यालयाचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पदात सेवा जेष्ठते नुसार सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,यापदावर जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी एका आदेशानुसार पदोन्नती दिली असुन यात ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोहेका संभाजी शेषेराव व्यवहारे,विक्रम बालाजी वाकडे, महंमद मजहर हुसेन शेख यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तर पोलिस नायक ते पोलिस हवालदार पदी माधव डफड़े,अमोल भोकरे, यांना पदोन्नती मिळाली आहे.

पदोन्नती प्राप्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक रोकडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, विजय कांबळे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, बाबुराव चव्हाण, गायकवाड ,पोलीस कर्मचारी भारती, शिवानंद कानगुले,सय्यद इब्राहिम, महाजन, शेट्टे, केंद्रे, मेकलवाड, सुनिल गटलेवार, टरके, बालाजी दंतापल्ले,कौठेकर,आडे, बनसोडे, वनंजे, घोणशेटवार, सुनिल गरदनमारे ,भातोनकर यांच्या सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते, यावेळी पदोन्नती प्राप्त पोलीस कर्मचारी यांच्या ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पोलीस निरीक्षक रोकडे व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button