धार्मिकमहाराष्ट्र

Mp. Ashok chavhan ; नांदेडकरांना श्रावणात महाशिवपुराण कथा श्रवणाचे भाग्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड। हिंदू धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यात नांदेडमध्ये महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधूर वाणीतून महादेवांच्या कथेचे श्रवण करण्याचे भाग्य नांदेडकरांना मिळतय असे भावोदगार माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी काढले. महाशिवपुराण कथा सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी संबोधन करताना ते बोलत होते.

आपल्या स्वागतपर छोटेखानी भाषणात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की , पंडित मिश्रा यांच्या वाणीतून महाशिवपुराण कथा ऐकण्यासाठी दुरदुरुन भक्तगण नांदेड मुक्कामी आले आहेत. या सर्व भक्तांचे नांदेडकरांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. या मोदी मैदानावर अनेक विराट सभा झाल्या आहेत पण या सर्व सभापेक्षा वेगळी भक्तीच्या शक्तीची अलोट गर्दी इथे पहायला मिळते आहे. पवित्र श्रावण महिन्यात मिश्राजींच्या सुमधूर वाणीतून आपल्याला महाशिवपूराण कथा ऐकायला मिळणे, हे आपले भाग्य आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी इथे लाखोंचा जनसमुदाय जमला आहे. प्रलयाच्या वेळी महादेवच तारणहार असणार, हा भक्तांचा विश्वास असल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील देव्हाऱ्यात शिवलिंगाची आवर्जून पूजा होते, असे खा. चव्हाण पुढे म्हणाले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शिवपुराणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्वाचे धार्मिक कार्य पं. प्रदीप मिश्रा यांनी केले आहे. या शिवमहापुराण कथेचे संयोजक शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांच्यामुळे नांदेडकरांसाठी हा योग जुळून आल्याचे सांगत खासदार चव्हाण यांनी या दोन्ही कुटुंबियांचे विशेष आभार मानले. दरम्यान, अफाट लोकप्रियतेचे धनी असलेले पंडित मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेच्या श्रवणासाठी नांदेडमध्ये लाखोंचा जनसमुदाय उसळला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button