‘Surajya Abhiyaan’ ; ‘सुराज्य अभियाना’च्या तक्रारीचा परिणाम ! – NNL

मुंबई| वाहनांच्या हेटलाईटची प्रकाशकिरणे कशी असावीत ? याविषयी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत मानके निश्चित करण्यात आली आहेत. याला डावलून काही वाहनचालक गाड्यांच्या हेटलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक लाईट बसतात. त्यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काहीजणांना स्वत:चा प्राणही गमवावा लागला. सुराज्य अभियानाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची नोंद घेऊन २३ ऑगस्ट या दिवशी परिवहन आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना दिला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.

वाहन चालवतांना चालकाचे डोळे समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशकिरणांमुळे दीपले जाऊ नयेत, यासाठी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’च्या अंतर्गत केंद्रशासनाने वर्ष २००५ मध्ये सुरक्षा मानकांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. प्रत्यक्षात यानुसार कार्यवाही होत नसल्याचे सुराज्य अभियानाच्या लक्षात आल्यामुळे परिवहन आयुक्तांकडे याविषयी तक्रार केली होती. या तक्रारीवरून परिवहन आयुक्तांनी आदेश दिले आहेत. हेडलाईटमध्ये नियमबाह्य पालट करणार्‍या वाहनांची पडताळणी करून दोषी वाहनचालकांवर कारवाई करावी, तसेच याविषयी जनजागृती करावी, असेही परिवहन आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकार्‍यांना कळवले आहे, असे श्री. मुरुकटे म्हणाले.

प्रत्यक्षात कारवाई व्हावी, अन्यथा न्यायालयात जाऊ !
खरे तर मोटार वाहन कायद्यामध्ये दोषींवर कारवाईची तरतूद असूनही परिवहन विभाग गांभीर्याने कारवाई करत नाही, असे आढळून आल्यामुळे आम्हाला परिवहन आयुक्तांकडे तक्रार करावी लागली आहे. परिवहन आयुक्तांनी प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकार्‍यांना केवळ आदेश देऊन न थांबता या प्रकरणी खरोखरच कारवाई होत आहे ना ? याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यामुळे राज्यातील अनेकांचे प्राण वाचतील. यावर कार्यवाही झाली नाही, तर या प्रकरणी आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही श्री अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button