Blogनांदेडसोशल वर्क

Talathi B. T. Shelke – निराधार महिलांचा छळ करणाऱ्या तलाठी बी.टी.शेळकेची हकालपट्टी करा व पीडित दलितांना घरकुल मंजूर करा! – NNL

नांदेड | संजय गांधी निराधार योजनेच्या शहरी विभागात वशिलेबाजीने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले तलाठी बी.टी.शेळके यांची हकालपट्टी करा आणि मौजे सोमेश्वर ता.जि.नांदेड येथील दलित पीडितांना घरकुल मंजूर करा ह्या मागणीसाठी सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे सह सचिव कॉ.जयराज गायकवाड हे मागील तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

प्रशासनात जबरदस्त छाप निर्माण करून वशिलेबाजीने अनेक वर्षांपासून संगायो मध्ये तलाठी या पदावर कार्यरत असलेले बी.टी.शेळके हे आर्थिक माया मिळविल्याशिवाय निराधारांना पात्र ठरवीत नाहीत. किंबहुना कुणाच्याही घरी प्रत्यक्षात जात नाहीत आणि पात्र मान्यता देतात. त्यांच्या विरोधात माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दि.१४ मे आणि ११ जून २०२४ रोजी दोन वेगवेगळ्या लेखी तक्रारी देऊन त्यांची बदली माहूर किंवा किनवट येथे करण्याची मागणी केली होती.

IMG 20240821 155754 Talathi B. T. Shelke - निराधार महिलांचा छळ करणाऱ्या तलाठी बी.टी.शेळकेची हकालपट्टी करा व पीडित दलितांना घरकुल मंजूर करा! - NNL

परंतु वरिष्ठानी दखल घेतली नसल्याने कॉ. जयराज गायकवाड यांनी थेट आमरण उपोषणास सुरवात केली आहे. तलाठी शेळके यांनी अमाप माया जमविली असून त्यांची खातेनिहाय चौकशी केल्यास मोठे घबाड सापडण्याची शक्यता आहे. तलाठी शेळके यांची तातडीने हकालपट्टी करावी तसेच मौजे सोमेश्वर ता.जि.नांदेड येथील नेमूबाई भगवान सरोदे व रामदास प्रसराम सरोदे यांना ग्रामपंचायतने पारित केलेल्या ठरावाप्रमाणे घरकुल मंजूर करावे.या दोन मागण्यासाठी मजदूर युनियनचे उपोषण सुरु आहे. वरिष्ठानी दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सह सचिव कॉ.जयराज गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!