Com. Gangadhar Gaikwad : १२ जून रोजी बांधकाम व घरेलू कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मोठ्या संख्येने सामील व्हावे – कॉ. गंगाधर गायकवाड
नांदेड| इमारत व बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगारांच्या विविध जीवनमरणाच्या मागण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दि. १२ जून रोज गुरुवारी मोर्चा सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून निघेल. सदरील मोर्चा मध्ये इमारत व बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगारांनी सामील व्हावे असे आवाहन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
कामगार संघटणांनी अथक परिश्रम करून ४४ कामगार कायदे तयार केले असून सरकार ते कायदे रद्द करू पाहत आहे. चार श्रम संहिता आणि विशेष जनसुरक्षा कायद्याला तीव्र विरोध होत असताना सरकार मनमानी करीत आहे. ज्या ज्या कामगारांचे नूतनिकरण व नोंदी आहेत त्यांना सरसगट भांडे संच आणि सर्व लाभ देण्यात यावेत. कामगार कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी यांची मनमान...
