Blogक्राईमनांदेड

19th Sarai Offender sent to jail : १९ व्या सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे (Operation flush out) नुसार कार्यवाही चालु आहे.

त्या अनुषंगाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे शेख महेबुब उर्फ गो- यापिता शेख बाबु, वय २२ वर्ष, व्यवसाय बेकार, राहणार- ग्रामपंचायत जवळ, वाजेगांव, ता. जिल्हा नांदेड याचेवर चोरी करणे, गृहअतिक्रमण करुन विनयभंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, दरोडा, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करणे, अवैद्यरित्या हत्यार बाळगणे व त्याची विक्री करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे एकुण ०८ दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे प्राप्त झाला होता.

मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन मा. श्री अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हा “धोकादायक व्यक्ती” असल्याने आरोपी नामे शेख महेबुब उर्फ गो-यापिता शेख बाबु, वय २२ वर्ष, व्यवसाय बेकार, राहणार- ग्रामपंचायत जवळ, वाजेगांव, ता. जिल्हा नांदेड यास एक वर्षाकरीता हर्सल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहे. नमुद आरोपीस मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील १८ गुन्हेगांराना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या १९ झाली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये १७९ प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. सन २०२३ मध्ये २६ टोळ्यामधील ७९ इसमांना तसेच सन २०२४ मध्ये ०६ टोळ्यामधील २२ इसमांना असे एकुण १०१ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button