Mla.Prataparav Patil Chikhlikar : साधू महाराज कंधारकर यांच्या पायीदिंडीचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मित्र मंडळाकडून स्वागत

नांदेड| जिल्ह्यातील पंढरपूरकडे जानारी सर्वात मोठी पायीदिंडी कंधार येथून निघते व आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भक्त आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरला पोहचते.

यावर्षी 19 जून 2025 रोजी कंधार येथून दिंडी निघाली व आज दिनांक 21 जून रोजी माळेगांव यात्रा ता.येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर परिवार व मित्र मंडळ यांच्याकडून दिंडीतील माऊली भक्तांना मनोभावे फराळ, जेवण व यथोचित सत्कार सन्मान करून नांदेड सरहद्दी वरून पंढरपूरकडे रवाना करण्यात आले. या प्रसंगी बोलताना आ.चिखलीकर म्हणाले विठ्ठलाच्या आशिर्वादाने निवडून आलो माऊली भक्तांच्या सेवेसाठी कमी पडणार नाही. साधू महाराज कंधारकर यांच्या दिंडी सोहळ्याची कमान नांदेड, लातूर सरहद्दीवर निच्शित करणार आसे सांगितले.

निवडणूक झाली या वेळेस लोकांनी जाती आधारित मतदान केले. माझा समाज एकवट माझ्यासोबत नसतानाही सर्व समाजातील सुजाण व वैचारिक लोकांनी मला मतदान केले व जातीयवादी प्रचार करणाराला घरी बसवले मी कधी कोणाची जात बघितली नाही, मी विठू माऊलीचा भक्त आहे, जसे सर्व जाती धर्माचे लोक फक्त पंढरपूरच्या वारीत असतात तसे माझ्या मतदानासाठी सर्व जाती धर्मातील वैचारिक लोकांनी मला मदत केली व चंद्रमुनी मस्के व नरेंद्र गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख करून जातीय राजकारण करणारावर ताशेरे ओढले व येणाऱ्या काळात मतदार ्संघात जातीय राजकारण होवू नये, यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची विनंती केली. मी दरवर्षी लोणंद येथे येत असतो याही वर्षी येईल, मी असलो नसलो तरी माझा परिवार व माझे कार्यकर्ते सतत दिंडीतील लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला.

या प्रसंगी ह.भ.प. एकनाथ महाराज, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज, जना माय, किर्ती माय, भास्कर महाराज, चालीकवार गुरूजी, बनवसकर महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, किरण सावकार वटमवार, केशवराव मुकदम, दत्ता वाले, मनोहर पाटील भोसीकर, स्वप्नील पाटील लुंगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील सावळे, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, किशनराव डफडे, नरेंद्र गायकवाड, रोहित पाटील, चंद्रमुनी मस्के, परमेश्वर मुरकुटे, वीरभद्र राजुरे, गणपत तिडके, बाळू बाबर, माऊली बाबर, बालाजी पाटील कदम, भगवान राठोड, राजकुमार कोकाटे, प्रभाकर सुरनर, बंडू पाटील वडजे, भानुदास पाटील मस्कीकर, पिराजी पोले, भिमराव नाईक, मारोती पाटील बोरगांवकर, बाळासाहेब गरजे, कांता पाटील बोडके, अंबादास जहागीरदार, सकाराम तिडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक,चेतन केंद्रे, बाबुराव कांबळे माळेगांव येथील सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, से.स.सो.चेअरमन राधाकिशन फुगनर आदी उपस्थित होते. आभार हणमंत धुळगंडे यांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button