नांदेडसोशल वर्क

Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती – NNL

नांदेड| 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील हैदर बाग परिसरात मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधु, मनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी,स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णी, संजय भालके व मुकुंद आळसपूरे यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

WhatsApp Image 2024 10 26 at 5.28.20 PM Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती - NNL

यावेळी मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधू यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विद्यार्थ्यांची रँली काढून परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. संपूर्ण हैदर बाग परिसरातील अनेक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा आर.जी.कुलकर्णी यांनी दिली. यानंतर प्रत्यक्ष शाळेत शिक्षक,पालक व जागरुक नागरिकांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. मतदारांना मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी लोकशाहीचा प्राण म्हणजे मतदार व आत्मा म्हणजे मतदान आहे. सर्व पात्र मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपले मतदान कर्तव्य पूर्ण करावे,असे मत त्यानी व्यक्त केले.

WhatsApp Image 2024 10 26 at 5.28.21 PM Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती - NNL

मनपा शाळा सुध्दा मतदान जनजागृतीमध्ये हिरीरीने भाग घेतात आणि जनजागृती करतात. यास प्रतिसाद देवून स्वीप कक्षाच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा आणि लोकसभा पोट निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत आपल्या मतदानाच्या अधिकाराचा नक्कीच योग्य उपयोग करावा असे प्रतिपादन मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंघ सधू यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजा पटेल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईराज मुदिराज,आशा घुले,संदीप लबडे,संभाजी पोकले,नाजिया तब्बसुम,निखत परविन,महेजबीन बेगम स्वच्छता निरीक्षक झियाउल्ला खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Image 2024 10 26 at 5.28.23 PM Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती - NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!