Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती – NNL
नांदेड| 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील हैदर बाग परिसरात मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधु, मनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी,स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णी, संजय भालके व मुकुंद आळसपूरे यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधू यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विद्यार्थ्यांची रँली काढून परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. संपूर्ण हैदर बाग परिसरातील अनेक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा आर.जी.कुलकर्णी यांनी दिली. यानंतर प्रत्यक्ष शाळेत शिक्षक,पालक व जागरुक नागरिकांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. मतदारांना मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी लोकशाहीचा प्राण म्हणजे मतदार व आत्मा म्हणजे मतदान आहे. सर्व पात्र मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपले मतदान कर...
