करियरनांदेड

Nanded news ; पत्रकारांच्या उपस्थितीत पतंजली योग शिक्षकांचा सन्मान सोहळा थाटात संपन्न

Patanjali Yoga teachers felicitated in the presence of journalists नांदेड। अकराव्या जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने नांदेड पतंजली योगपीठ परिवाराच्या योगशिक्षक व योगशिक्षिका विविध विद्यालय, महाविद्यालय, संस्था, शासकीय ऑफिस, योगवर्ग आदी ठिकाणी प्रोटोकॉल नुसार योगवर्ग घेतला. प्रत्यक्ष मुलांना, तरुणांना, योगसाधकांना आसन प्राणायाम योगिक जॉगिंग सूक्ष्मव्यायाम सूर्यनमस्कार ध्यान आदिंचे धडे देणाऱ्या योगशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

रविवार, दि.29 जून रोजी पतंजली योगपीठ परिवारातर्फे ज्येष्ठ पत्रकार धोंडोपंत विष्णुपुरीकर, कृष्णा उमरीकर, रविंद्र कुलकर्णी, गिरीश कहाळेकर यांच्या हस्ते प्रोटोकॉल प्रमाणे जागतिक योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योग शिकवलेल्या योगशिक्षक व योगशिक्षिकांचा शाल, प्रशस्तीपत्र व पतंजली अंगवस्त्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. सर्वश्री पंढरीनाथ कंटेवाड, राम शिवपनोर, सुरेश लंगडापुरे, श्रीमती नंदिनीताई चौधरी, आदींनी पत्रकारांचा सन्मान शाल पतंजली अंगवस्त्र प्रदान करून केला.

कार्यक्रमाला सर्वश्री रावसाहेब साजने, उर्मिला साजने, अनिल कामीनवार, अशोक कुरुडे, भाग्यश्री असोरे, शुभांगी महात्मे, चित्रा चिमणे, अनिता आठवले, सुरेखा कुलकर्णी, अहिल्या गायकवाड, ताराबाई पवार, विद्या सोरगे, छाया संगणवार, शशिकला पवार, उज्वला जनकवाडे, रामराव जनकवाडे, गोविंद पोळे, गजानन पानपट्टे, मुंजाजी जाधव, यश पानपट्टे, विष्णुदास शिंदे, अनिल कदम, सतीश डोईफोडे, माधव पचलिंगे, रामेश्वर थोटे, जनार्दन आठवले, मोहन देशमुख, हरिहर नरवाडे, एकनाथ पाटील इंगोले, भगवान इंगोले, संतोष दंडे, अनुसया चौधरी, वैजयंता पाठक, सुनिता डांगे, उत्तमराव वट्टमवार, बालाजी कहाळेकर, सुरेखा घोगरे, डॉ. सुनिता वैजवाडे, व्यंकट कोडगिरे, देवेश सलगरकर आदी मान्यवर उपस्थित होते, असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button