District Health Officer visits a fever-stricken patient नांदेड। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत पारोटी तांडा येथील हिवताप दुषित रूग्ण आढळून आला असून. सदरील रूग्णास डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी दि. 28 जून रोजी भेट देऊन. सदरील गावात व आजुबाजूच्या पाच किलोमीटर अंतरावरील गावातील ताप रूग्णांचे रक्त नमुने व सिरम सॅंपल घेण्याच्या सूचना दिल्या.


त्याचबरोबर परिसरातील सर्व गावांमध्ये कंटेनर सर्वेक्षण करून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील नाल्या, गटार वाहती करण्याचे व परिसर स्वछ करण्यासाठी ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन धुर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदरील रूग्ण हा हैदराबाद येथे कामानिमित्त गेला असता हिवतापाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.


त्यामुळे डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांना कामानिमित्त मुंबई, पुणे, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक येथे बाहेर गावी गेलेल्या व्यक्तींचे रक्त नमुने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबत डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी किटकजन्य आजार संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
