अर्धापूर तालुक्यातील देगाव कु. व डौर ग्रामपंचायतीवर महिलाराज -NNL

अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील देगाव कु व डौर ग्रामपंचायत निवडणुक निकाल मंगळवारी जाहीर झाला असून देगाव कु येथे उषा फुलारी तर डौर येथे राधा आढाव यांची थेट जनतेतून सरपंच पदी वर्णी लागली आहे.

अर्धापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून देगाव कु.येथे उषा राजेश्वरराव फुलारी १०२० मते घेऊन विजयी झाल्या तर मीरा रघुनाथ आमलगौंड यांचा ६७ मतांनी पराभव झाला आहे. भगवान कदम, रेणुका देविदास राजाळे, जिजाबाई गंगाधर कदम, लक्ष्मीबाई बालाजी कदम, संतोष कदम, रामकृष्ण कदम, मिरा महेंद्र अटकोरे, अर्चना संजय कदम,विश्वांभर नागोराव कदम सदस्य निवडून आले आहेत.

IMG 20221220 WA0206 अर्धापूर तालुक्यातील देगाव कु. व डौर ग्रामपंचायतीवर महिलाराज -NNL

डौर ग्रामपंचायत सरपंच पदी आढाव राधाबाई नरोजी आढाव या २५२ मतांनी विजयी झाल्या तर शितल अशोक शिंदे ९१ मतांनी पराभूत झाल्या येथील सदस्य अनिताबाई मधुकर राठोड,रामा जाधव,सिताबाई रघुनाथ शिंदे, श्यामबाला संदिप शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,निर्मला केशव गायकवाड,संभाजी होंडाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या हाती गत दहा वर्षे येथील सत्ता होती.यावेळी पराभव पत्करावा लागला.येथील ग्रामस्थांनी नवतरूणांना संधी दिली. निवडून आलेल्या उमेदवारांवर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!