Ajitdada Pawar : अजितदादा पवार यांना हिमायतनगरात सर्वपक्षीय श्रद्धांजली; बाजारपेठ बंद ठेवून शोक व्यक्त
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जनतेचे लाडके नेते अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत झालेल्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कणखर, दूरदृष्टी असलेले आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे नेतृत्व गमावले आहे.
या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात सर्वपक्षीय नागरिक व व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील वातावरण शोकमय झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि हळहळ स्पष्टपणे दिसून येत होती.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस यांसह सर्वपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक म...
