नांदेड

विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न – NNL

नांदेड। सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते आज घडीला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी म्हणून सर्वपरिचित असणारे शिवश्री शाम पाटील वडजे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मराठा युवा क्रांती महाराष्ट्र राज्य व शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.सामाजिक भान जपत सामाजिक कार्यकर्त्याने पुन्हा एकदा समाजाने अनुकरण करावा असा सामाजिक ऋणानुबंध जपणारा उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला. श्याम पाटील वडजे यांच्या वाढदिवसानिमित्त आज घडीला मराठवाड्यामध्ये रक्ताची कमतरता भासत आहे. या गोष्टीची जाण ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

निसर्गाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी पर्यावरणाकडे त्याचबरोबर चिरंतन नैसर्गिक समतोल राहावा व भारतात सर्वात जास्त उष्णता असलेला म्हणून नांदेडची झालेली नोंद या सर्व गोष्टीचा विचार करत 1000 वृक्षाचे वृक्षरोपण व संगोपन जबाबदारी मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आली.माणसाने “मरावे परी कीर्ती रूपे उरावे” या उक्तीप्रमाणे अवयव दान संकल्प त्याविषयीची जागरूकता व या सोहळ्याच्या निमित्ताने प्रचार करून लोकांमध्ये मरणोत्तर अवयव दान ही कशी काळाची गरज आहे याविषयी मार्गदर्शन करून अवयव दान संकल्प शिबिर घेण्यात आले,त्याचबरोबर असर्जन येथील अनाथ आश्रमामध्ये 140 विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

श्याम पाटील वडजे हे सामाजिक जाण असणारे आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित आहे. अतिशय कमी वेळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये आपल्या सामाजिक कार्याने आज घडीला ते एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत.तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकरी कुटुंबातील या युवकाने आपल्या धडपडीच्या, प्रामाणिकतेच्या आणि स्वकर्तुत्वाच्या जोरावर त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.जिल्हाभरातला त्यांचा वावर ,ग्रामीण भागाशी जोडली गेलेली नाळ ,सभोवताली असणारे तरुणांचे वलय यामुळे जिल्ह्याभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. जमिनीवरती पाय ठेवून आभाळायला गवसनी घाल्याचे समर्थ या व्यक्तिमत्त्वात असून काल त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्त सर्वसामान्य तळागाळातल्या शेतकऱ्यांपासून ते अगदी विविध सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक ,वैद्यकीय ,व्यापारी, पत्रकर सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळीने त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावून त्यांच्या कार्याचा कर्तुत्वाचा गौरव केला.

महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी देखील श्याम पाटील वडजे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हाजरी लावून त्यांच्या कार्याविषयी तोंड भरून कौतुक करत,”भान विसरून सामाजिक भान जपणार तरुण म्हणून मी त्यांना ओळखतो “असे त्यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त करत त्यांच्या पुढील कार्यकर्ते शुभेच्छा दिल्या .

.

महाराष्ट्र राज्याचे मा.शिक्षणमंत्री मा.डी पी सावंत साहेब. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार ,वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे ,मा.जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर , किशोर स्वामी,रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माध्यम शास्त्र संकुलाची संचालक मा.डॉ.दीपक शिंदे, विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे बंधू मा. उपमहापौर आनंद चव्हाण , मा.उपमहापौर विनय गिरडे , आधार हॉस्पिटलची संचालक डॉ.संजय कदम ,संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रल्हाद कोटकर ,मा.नगरसेवक संदीप चिखलीकर ,मा.शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे,कंधारचे नेते पुरुषोत्तम धोंडगे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधीक्षक अभियंता इंजि .तानाजी हुस्सेकर ,नगरसेवक प्रतिनिधी संजय पाटील घोगरे, मराठी पत्रकार संघाचे रमेश ठाकूर व पदाधिकारी सकाळचे जेष्ठ पत्रकार श्याम जाधव , आदर्श शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पंडित पवळे सर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धव सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष कल्पनाताई चव्हाण ,जिजाऊ ब्रिगेडच्या नांदेड दक्षिण अध्यक्ष सुमित्रा वडजकर ,प्रदेश संघटक वनिता देवसरकर, मनोज पाटील समर्थक रेखाताई पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सुनंदाताई जोगदंड, शहराध्यक्ष सुरेखा पाटील व महिला पदाधिकारी , शिवसेनेचे नेते मनोज भंडारी यांच्यासह अनेक तालुक्यातील विविध क्षेत्रातील समाज बांधव मित्र परिवार यांनी रात्री उशिरा पर्यंत शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली तर मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी पण व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याचे सूत्रसंचलन शाहिर गौतम पवार यांनी केले तर सोहळा यशस्वी करण्यासाठी सौ. सुचिता जोगदंड- वडजे, नाना पाटील वानखेडे, दिलिप गवळी, अनिल उमरेकर, दत्ता कदम, दत्ता जाधव, चंद्रपाल बैस, कपील चपटे, दत्ता पाटील, दाजीबा भवर, आनंद जाधव, साचिदानंद पाटील, नितीन कोकाटे, योगेश कदम आदीनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button