विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न – NNL
नांदेड। सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते आज घडीला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी म्हणून सर्वपरिचित असणारे शिवश्री शाम पाटील वडजे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मराठा युवा क्रांती महाराष्ट्र राज्य व शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.सामाजिक भान जपत सामाजिक कार्यकर्त्याने पुन्हा एकदा समाजाने अनुकरण करावा असा सामाजिक ऋणानुबंध जपणारा उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला. श्याम पाटील वडजे यांच्या वाढदिवसानिमित्त आज घडीला मराठवाड्यामध्ये रक्ताची कमतरता भासत आहे. या गोष्टीची जाण ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
निसर्गाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी पर्यावरणाकडे त्याचबरोबर चिरंतन नैसर्गिक समतोल राहावा व भारतात सर्वात जास्त उष्णता असलेला म्हणून नांदेडची झालेली नोंद या सर्व गोष्टीचा विचार करत 1000 वृक्षाचे वृक्षरो...
