नांदेडसोशल वर्क

Narayan Shinde ; नारायण शिंदे यांच्या लुटीचा ताळेबंद चे उद्या प्रकाशन

नांदेड l ज्येष्ठ लेखक, कवी नारायण शिंदे यांचा यांच्या लुटीचा ताळेबंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्या दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गणराज फंक्शन हॉल नमस्कार चौक नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.

आ. सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य अकादमी प्राप्त बालकवी डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी कवितेचे अभिवाचन प्रसिद्ध कवी आत्माराम राजेगोरे हे करणार आहेत तर प्रकाशन आहे विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे , ह भ प भास्करबुवा शिंदे , विजयकुमार चित्तरवाड , दिलीप धर्माधिकारी आणि दिगंबर कदम यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. निर्मल प्रकाशनाने प्रकाशनसाठी सिद्ध केलेल्या या प्रकाशन सोहळ्यास साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी आणि यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button