Indian Medical Association ; इंडियन मेडीकल असोशिएसन च्या वतीने मतदात्यांना घवघवीत सूट मतदान करा सूट मिळवा – आयएमए – NNL

नांदेड l महापालिकेचे आयुक्त .डॉ.महेशकुमार डोईफोडे यांना आयएमए च्या नांदेड शाखेच्या वतीने येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान जनजागृती आणी टक्केवारी वाढविण्यासाठी आयएमए नांदेड च्या सहभागासाठी नुकतीच निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे.

यात आयएमए ने म्हटले आहे की येत्या २० नोव्हेंबेर बुधवार रोजी विधानसभा आणी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान जनजागृती आणी मंतदानाची टक्केवारी वाढविणे या करता आयएमए नांदेड च्यावतीने एक छोटासा प्रयत्न करण्यात येणार आहे यात लोकांच्या आरोग्या सोबत लोकशाहीचे सुद्धा आरोग्य जपणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो त्या करीता दि २०/११/२०२४ बुधवार रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी जो रुग्ण मतदान केल्याची ओळख म्हणजे बोटाला शाई दाखवेल त्या प्रत्येक रूग्णाला डॉक्टरांकडून खालील सुविधा देण्यात येतील.

 

यात तपासणी फीस म्हणजेच ओ.पी.डी. फीस मध्ये ३०% सवलत तसेच

रेडीओलॉजी अंतर्गत येणाऱ्या सिटी स्कॅन, एमआरआय, एक्सरे , सोनोग्राफी , मॅमोग्राफी यासाठी २०% सवलत देण्यात येणार आहे तर विविध प्रकारच्या पॅथॉलॉजी तपासण्यांसाठी ३०% सवलत देण्यात येणार आहे.

 

तरी जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करून आपली भारतीय लोकशाही आणखी सशक्त व मजबूत करण्यासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयएमए नांदेडड चे अध्यक्ष डॉ प्रल्हाद कोटकर , सचिव डॉ राहुल लवहेकर यांच्यासह आयएमएच्या सदस्यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button