करियरनांदेड

Cyprus students score hat-trick : सायप्रसच्या विद्यार्थ्यांनी श्री परमेश्वर यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमात मारली हैट्रिक

हिमायतनगर,अनिल मादसवार| महाशिवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सायप्रस इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सादरीकरण करून सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक जिंकून हैट्रिक मारली आहे. प्रेक्षकांच्या व समिक्षकांच्या पसंतीस दोन्ही गीतांवरील नृत्य उतरले असल्याने त्यांना प्रथम क्रमांकांचे बक्षीस देण्यात आले.

श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमेटीच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच श्री परमेश्वर मंदिर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील १३ शाळांनी सहभाग नोंदविला होता. या महत्वपूर्ण स्पर्धेत हिमायतनगर येथील दिपनगर खडकी बा. येथे असलेल्या सायप्रस इंग्लिश मेडियम स्कूलच्या इयत्ता ४ व ५ वीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेऊन ‘आम्ही जातीचे शेतकरी’ हे गीत, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’चा संदेश देणारे गीत व ‘कहते हमको इंडिया वाले’ हे देशभक्तीपर गीत असे दोन्ही गीत उत्कृष्टरित्या सादर करून दाद मिळवली.

त्यांच्या या गीताच्या सादरीकरणाने महाशिवरात्र यात्रा महोत्सव २०२५ मध्ये उत्कृष्ट गुण घेऊन अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. सलग तिसऱ्या वर्षै सायप्रस स्कुलच्या विद्यार्थ्यांनाही प्रथम क्रमांक जिंकून हैट्रिक मारली आहे. त्यामुळे निवड समितीने या शाळेची प्रथम क्रमांकांसाठी निवड करून मंदिर समितीच्या हस्ते प्रथम क्रमांकचे बक्षीस व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सायप्रस स्कुलचे संचालक दिलीप राठोड, सौ. माया राठोड, दिनेश राठोड, वर्षा मोरे आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button