नांदेडलाइफस्टाइल

60 thousand rupees subsidy distributed to three families : तीन कुटुंबांना 60 हजाराचे अनुदान वाटप 

श्री क्षेत्र माहूर l चिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डि.बी.टी. द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आल्याने. या योजनेत पात्र ठरलेल्या प्रकरणातील तिघांच्या वारसाना प्रत्येकी 20000 असे 60 हजाराचे अनुदान देण्यात आलेली माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आहे

शासन निर्णय क्रमांक : राकुला-2012/प्र.क्र.277/विसयो-2, मंत्रालय मुंबई, दि. 21 नोव्हेंबर 2013 अन्ध्ये दारिद्रय रेषेखाली नोंद असलेल्या कुटूंबातील 18 ते 59 वयोगटातील कोणतीही कमावती व्यक्ती मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटूंबियास राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ देण्यात येतो.

त्यानुषंगाने माहूर तहसिल कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जानुसार 3 पात्र लाभार्थ्यांना (1. गोदावरी संदीप रसाळे रा. हडसणी, 2. करुणाबाई वसंत खडके रा. बोरवाडी, 3. सुशीला गंगाराम पेटकुले रा. सिंदखेड प्रत्येकी रु.20000/- याप्रमाणे रु. 60000/- चे अनुदान पी एफ एम एस प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार किशोर यादव यांनी दिली आहे. तसेच माहूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी योग्स त्या कागदपत्राची पुर्तता करुन राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. याकामी संगांयो विभागाचे नायब तहसिलदार डॉ. राजकुमार राठोड, महसूल सहायक वैभव पांढरे, आय. टी. असिस्टंट उदय वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button