कृषीनांदेड

Provide immediate relief : लोह्यातील पूरग्रस्त कुटुंबियांना तात्काळ अनुदान द्या

लोहा | लोहा शहरात २९ ऑगस्ट रोजी झालेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून, अद्यापही अनेक पूरग्रस्त कुटुंबांना अनुदान मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार विठ्ठल परळीकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान वितरित करण्याची ठाम मागणी केली.

महापुरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, धान्यसाठा, फर्निचर तसेच दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टी व नाल्यांच्या फुटीमुळे शहरात हाहाकार उडाला होता. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यावेळी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे होऊनही अद्याप अनुदान न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

निवडणूक आचारसंहिता संपताच पूरग्रस्तांना अनुदान वाटप करण्याच्या सूचना आमदार चिखलीकर यांनी दिल्या होत्या. मात्र, विलंब होत असल्याने नगरपालिकेच्या वतीने तहसीलदारांकडे पुन्हा मागणी करण्यात आली. या वेळी नगरसेवक गणेश बगाडे, अविनाश पवार, इरबा पवार, सदानंद तेलंग, श्रीकांत मंजलवाड यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

अनुदान लवकरच वितरित होणार

पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत झालेल्या चर्चेत तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी आवश्यक कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच अनुदान वितरित केले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button