Thursday, May 14

Tag: to flood affected families of Loha

Provide immediate relief : लोह्यातील पूरग्रस्त कुटुंबियांना तात्काळ अनुदान द्या

Provide immediate relief : लोह्यातील पूरग्रस्त कुटुंबियांना तात्काळ अनुदान द्या

कृषी, नांदेड
लोहा | लोहा शहरात २९ ऑगस्ट रोजी झालेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून, अद्यापही अनेक पूरग्रस्त कुटुंबांना अनुदान मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार विठ्ठल परळीकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान वितरित करण्याची ठाम मागणी केली. महापुरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, धान्यसाठा, फर्निचर तसेच दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टी व नाल्यांच्या फुटीमुळे शहरात हाहाकार उडाला होता. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यावेळी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे होऊनही अद्याप अनुदान न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. निवडणूक आचारसंहिता संपताच पूरग्रस्तांना अनुदान वाटप करण्याच्या सूचना आमदार चिखलीकर यांनी दिल्या होत्या. मात्र, विलंब होत असल्याने नगरपा...
error: Content is protected !!