नांदेड| गेल्या महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठी अतिवृष्टी झाल्याने गोदावरी नदीला मोठा महापुर येऊन अनेकांच्या घरातील जिवनावश्यक वस्तू वाहून गेल्या तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले. असून या पिडीत कुटुंबाला आधार देण्यासाठी नासिक येथील स्वर्णकार महिला मंडळ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्कार प्राप्त असलेल्या श्रीमती मीनाताई सोनार, यांच्या कडून रविवार (ता.५) रोजी पुरग्रस्त सर्व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.


ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टी होऊन गोदावरी नदीच्या महापुरात अनेकांची घरे उद्वस्त झाली . कपड्यासह घरातील सर्वच वाहून गेले. अशा परिस्थितीत आपण बग्याची भूमिका न घेता. आपण समाजाचे काही देणं लागतो. अशावेळी मानव धर्म पाळणार नाही तर कधी पाळणार आहोत . त्यामुळे येथील पुरग्रस्तांची आपल्याने होईल तेवढी त्यांची मदत करावी हा, उद्दात हेतू, डोळ्या समोर ठेवून महाराष्ट्र राज्याचा समाज भूषण पुरस्कार प्राप्त असलेल्या श्रीमती मीनाताई सोनार, यांनी आपल्या महिला सहकार्यांना सोबत घेऊन नांदेड येथील सर्व पिडीत पुरग्रस्त महिलांना एक हात मदीचा उपक्रम राबवत साड्याचे वाटप करत दिवाळीची जणू भेटच देवून आपले सामाजिक कार्य केले आहे.


यावेळी ज्येष्ठ समाजसेविका गीताताई नवसे, सौ.प्रमिलाताई कैलास मैद, सौ तनुजाताई गोपाळ कुलथे ,सौ अनिताताई मंडलिक, माजी नगरसेविका सौ लंकाताई हगावणे, शुभांगी काजळे, सीमाताई माळवे, सौ पुष्पाताई कुलथे, प्रीतीताई बोबाडे, सौ मीनाक्षीताई रूपवते, श्रीमती पवळेताई, वीणाताई व सौभाग्य नगरचे गजानन लॉन्ड्री वाले अमित , शीलाताई डहाळे, मयांक डहाळे, यांच्यासह आनेकांनी मदत करून नांदेड येथील पुरग्रस्त महिलांना साड्या वाटप करून मदत केल्याने येथील पुरग्रस्त महिलांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात का होईना दुःखावर सुखाची किनार टाकली असल्याचे आनंद दिसत होते.


ही, पुर परिस्थिती म्हणजे नैसर्गिक संकट आहे. अशा संकटाच्यावेळी आपण मानव धर्म पाळला पाहिजे आपल्याने जेवढी होईल तेवढी त्यांची मदत करून त्यांचे दुःख वाटून घेऊन त्यांना आधार देऊन त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या पाठीशी उभे राहाणे हीच खरी मानवता आहे. एकमेकांची मदत करत ही, मानवता प्रत्येकाने जपली पाहिजे. — श्रीमती मीनाताई सोनार,- स्वर्णकार महिला मंडळ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा आहेत.



