Support Flood affected : पुरग्रस्त महिलांना नासिक येथील स्वर्णकार महिला मंडळ सामाजिक संस्थेचा आधार
नांदेड| गेल्या महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठी अतिवृष्टी झाल्याने गोदावरी नदीला मोठा महापुर येऊन अनेकांच्या घरातील जिवनावश्यक वस्तू वाहून गेल्या तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले. असून या पिडीत कुटुंबाला आधार देण्यासाठी नासिक येथील स्वर्णकार महिला मंडळ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्कार प्राप्त असलेल्या श्रीमती मीनाताई सोनार, यांच्या कडून रविवार (ता.५) रोजी पुरग्रस्त सर्व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टी होऊन गोदावरी नदीच्या महापुरात अनेकांची घरे उद्वस्त झाली . कपड्यासह घरातील सर्वच वाहून गेले. अशा परिस्थितीत आपण बग्याची भूमिका न घेता. आपण समाजाचे काही देणं लागतो. अशावेळी मानव धर्म पाळणार नाही तर कधी पाळणार आहोत . त्यामुळे येथील पुरग्रस्तांची आपल्याने होईल तेवढी त्यांची मदत करावी हा, उद्दात हेतू, डोळ्या समोर ठेवून महार...
