करियरनांदेड

Successful students ; विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते होणार सत्कार – NNL

नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संकुलामधून ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’ आणि ‘यूपीएससी’ व ‘एमपीएससी’ मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते दि.१४ ऑगस्ट रोजी स. ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये होणार आहे.
विद्यापीठ परिसरातील संकुलामधून जवळपास १२५ विद्यार्थी यावर्षी ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’ आणि ‘यूपीएससी’ व ‘एमपीएससी’ सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. यानिमित्त यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यामधून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पालकासह विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात निमंत्रित केले आहे आणि त्यांचा सन्मानही पालकासह होणार आहे. असे समितीचे प्रमुख तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील यांनी कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!