नांदेडमहाराष्ट्र

rescue operation : रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने केले पुरग्रस्तांचे मदतकार्य सुरू

हिमायतनगर, अनिल मादसवार| पूरग्रस्त भागात येणाऱ्या मौजे सिरपल्ली गावातील एक गर्भवती महिलेला बोट च्या सहाय्याने सुखरूप बाहेर आणले आहे. सदर गर्भवती महिलेस पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाची टीम आणि महसूल विभागाची टीम कार्यरत आहे.

1009069942 rescue operation : रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने केले पुरग्रस्तांचे मदतकार्य सुरू

मागील पाच दिवसांपासून अतिवृष्टी व इसापूर धरणाच्या विसर्गामुळे शिरपल्ली व डोल्हारी गावांचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. रस्ते व पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने प्रशासनाला या गावात पोहोचणे अशक्य झाले होते. आज दिनांक २१ रोजी हादगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या नेतृत्वात व नायब तहसीलदार एच. जी. पठाण यांच्या पुढाकारातून महसूल विभाग व वैद्यकीय पथकाने बोटीच्या सहाय्याने या गावात प्रवेश केला. गावात पोहोचताच पथकाने तात्काळ आरोग्य सेवा सुरू केली. लहान मुले, वृद्ध व रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, गंभीर रुग्ण आढळले नाहीत.

1009069941 rescue operation : रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने केले पुरग्रस्तांचे मदतकार्य सुरू

यावेळी मौजे शिरपल्ली येथील एका गर्भवती महिलेला बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर येथे दाखल करण्यात आले. या मोहिमेत नायब तहसीलदार एच. जी. पठाण, मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी सब्बनवार, डॉक्टर प्रताप परभनकर, डॉक्टर गोविंद वानखेडे, आशा वर्कर कांताबाई तपासकर, पोलीस पाटील योगेश आलेवाड, कर्मचारी हरीश गिरी, वाहनचालक आकाश बारकुल व बोट चालक रवी अंभोरे यांनी परिश्रम घेतले. १५ ऑगस्टपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. काल प्रतिकूल हवामानामुळे पथकाला प्रवेश करता आला नव्हता, मात्र आज सकाळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे मनःपूर्वक स्वागत केले.

1009068421 scaled rescue operation : रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने केले पुरग्रस्तांचे मदतकार्य सुरू

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!