rescue operation : रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने केले पुरग्रस्तांचे मदतकार्य सुरू
हिमायतनगर, अनिल मादसवार| पूरग्रस्त भागात येणाऱ्या मौजे सिरपल्ली गावातील एक गर्भवती महिलेला बोट च्या सहाय्याने सुखरूप बाहेर आणले आहे. सदर गर्भवती महिलेस पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाची टीम आणि महसूल विभागाची टीम कार्यरत आहे.
मागील पाच दिवसांपासून अतिवृष्टी व इसापूर धरणाच्या विसर्गामुळे शिरपल्ली व डोल्हारी गावांचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. रस्ते व पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने प्रशासनाला या गावात पोहोचणे अशक्य झाले होते. आज दिनांक २१ रोजी हादगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या नेतृत्वात व नायब तहसीलदार एच. जी. पठाण यांच्या पुढाकारातून महसूल विभाग व वैद्यकीय पथकाने बोटीच्या सहाय्याने या गावात प्रवेश केला. गावात पोहोचताच पथकाने तात्काळ आरोग्य सेवा स...
