लोहा। विद्यार्थी गुणवता विकास महाअभियान अंतर्गत शाळांची तपासणी सुरू आहे. विद्यार्थ्यांना भाषा गणित याचे आकलन झाले पाहिजे. अध्ययन निष्पत्ती झाली पाहिजे आता कागदावर गुणवता टिकणार नाही. ती वास्तवात उतरली पाहिजे असे मार्गदर्शन लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी केले.
शिवछत्रपती विद्यालयात विद्यार्थी गुणवता विकास महाअभियान अंतर्गत तपासणी बिईओ सतीश व्यवहारे यांनी केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे,केंद्र प्रमुख डी आर शिंदे , केंद्र प्रमुख बाबुराव फसमले ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली मुख्याध्यापक यांच्या प्रशासनाचा गौरव केला शिक्षकांनी गुणवता वाढवावी तसेच विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान आले पाहिजे ,अध्ययन निष्पत्ती निश्चित करताना पुन्हा पडताळणी होणार आहे. असे सांगून बिईओ यांनी महत्वाच्या सूचना दिल्या.
मुख्याध्यापक श्री वडजे यांनी विविध उपक्रम व शालेय अभिलेखे बाबत माहिती दिली.बिईओ व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला .बिईओ व केंद्र प्रमुख यांनी वर्ग तपासणी व विद्यार्थी गुणवता तपासणी केली संचलन व आभार जेष्ठ शिक्षक बालाजी गवाले यांनी केले यावेळी काहलेकर, शेख गुद्धे, पारेकर, धुतमल ,शेटे पारेकर, कर्मचारी उपस्थित होते.