नांदेड। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करतांना आपली गुणवत्ता सिद्ध करत एकूण ३०० विद्यार्थ्यांपैकी तब्बल २०० विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र ठरले असून याबरोबरच ओमसाई ठाकूर याने राज्यात ६ वा क्रमांक पटकाविला आहे तर कू. श्रुतिका येलगे हिने पटकाविला १६ क्रमांक आहे.
मुलांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी व विषयांचे सखोल ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा बालगावी, या उद्देशाने महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे इयत्ता पाचवी व आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या दोन्ही परीक्षेत नांदेडच्या कोनाळे क्लासेसच्या फाऊंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करत आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोवला आहे.
कोनाळेज् चे विद्यार्थी हे दरवर्षी संस्थेच्या यश परंपरेत आपल्या क्षमतेची भर घालत मानाचा तुरा खोवत आहेत. संपलेल्या शैक्षणिक वर्षात उपरोक्त बोर्डाने घेतलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ओमसाई ठाकूर हा विद्यार्थी ६ व्या क्रमांकाने उतीर्ण झाला आहे तर राज्यस्तरावर ऋुतिका येलगे (सोळावी) यासोबतच जिल्हास्तरावर कु.गौरी लुटे (दुसरी), वरद वायचाळ (व्दितीय), सर्वेश काटकर (चतुर्थ) कृष्णा लाटेकर (पाचवा) तर वेदांत मंगनाळे (सातवा) व आदर्श नरवटे हा (आठवा) आला आहे त्यासोबतच ६० विद्यार्थ्यांनी यांनी जिल्हास्तरावर रँक मिळविले आहे
कोनाळे क्लासेसच्या फाऊंडेशनच्या सर्व विद्यार्थ्यांना कोनाळेज् चे संचालक प्रा.व्हि.डी. कोनाळे व सौ. कोनाळे मॅडम व तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले असून कोनाळे क्लासेसचे संचालक प्रा.व्हि.डी.कोनाळे व अन्य सर्व संबंधितांनी यशवंतांचे अभिनंदन केले आहे.