कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परिक्षेत झेंडा -NNL
नांदेड। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करतांना आपली गुणवत्ता सिद्ध करत एकूण ३०० विद्यार्थ्यांपैकी तब्बल २०० विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र ठरले असून याबरोबरच ओमसाई ठाकूर याने राज्यात ६ वा क्रमांक पटकाविला आहे तर कू. श्रुतिका येलगे हिने पटकाविला १६ क्रमांक आहे.
मुलांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी व विषयांचे सखोल ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा बालगावी, या उद्देशाने महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे इयत्ता पाचवी व आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या दोन्ही परीक्षेत नांदेडच्या कोनाळे क्लासेसच्या फाऊंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करत आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोव...
