नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर पोलिसांनी रेती चोरी उघडकीस आणून 3 लक्ष 55,000/- रुपयाची मालमत्ता हस्तगत केले. तर दुसऱ्या एका कार्यवाहीत गोवंश घेऊन जातानाची चोरी उघडकीस आणून 3 लक्ष 36,000/- रुपयाची मालमत्ता हस्तगत करून (Strong action by Himayatnagar Police; Cattle and sand smugglers exposed) अवैध्य धंदे करणाऱ्यांना खाकीच्या कार्याची चुणूक दाखवून दिली आहे. यानंतर तरी शहर व तालुका परिसरात होणारे अवैध्य धंदे थांबतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


नांदेड जिल्ह्यामध्ये वाळू माफीया कडुन अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करु शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने पोलीस अधिकाहस्क अविनाश कुमार नांदेड यांनी पो.स्टे. हद्दीत अवैध वाळू उपसा, वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने श्रीमती शफकत आमना, सहा. पोलीस अधिक्षक, उप विभाग भोकर यांनी दि.17.02.2025 रोजी 23.00 ते दि.18.02.2025 रोजी 03.00 वा. दरम्यान ऑपरेशन प्लॅश आऊट अंतर्गत दि. 17/02/2025 रोजी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना 23.15 वाजेच्या सुमारास दिघी शिवारालगत, पैनगंगा नदी पात्रामध्ये एक हिरव्या रंगाचा जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली रेतीने भरून चोरटी वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाल्याने 23.45 वा. चे सुमारास गौण खनिज उत्खनन ठिकाणी छापा टाकला.


ट्रॅक्टर क्र. MH-29-AD-9655 व ट्रॉली कि. अं.3,50,000/- रु.) व अंदाजे एक ब्रास रेती कि.अं.05,000/- रु. अशी एकूण 03,55,000/- रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली असुन, हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोनि.अमोल भगत यांचे फिर्यादी वरुन आरोपी शिवाजी आनंतराव माने, 38 वर्ष, धंदा ट्रॅक्टर चालक/मालक, रा.ठि. बोरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट पोहवा/2204, पाटील हे करीत आहेत.

ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करून चोरीसह इतर गुन्हे उघडकीस आणणेच्या वरिष्ठानी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अमोल भगत दि. 16/02/2025 रोजी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असतांना गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, शेतकरी आडत दुकाना समोर, किनवट रोड, हिमायतनगर या ठिकाणी अवैध रित्या गोवंशाची पिवळ्या रंगाच्या टाटा एस टेम्पो मध्ये वाहतुक होत आहे. सदरची माहीती प्राप्त होताच 13.30 वा. चे सुमारास नमुद ठिकाणी जाऊन पहाणी केली असता पिवळ्या रंगाच्या टाटा एस टेम्पो क्र. MH-22-AN-2784 कि.अं.2 लक्ष 80,000/- रु. चा चालक नामे रविकांत गंगारेड्डी बाशेट्टीवार, हि.40 वर्ष, रा. मांडवा, ता. किनवट, जि. नांदेड हा नमुद मो/टेम्पोमध्ये 4 गोवंश कि.अं. 34,000/- रु., 1 म्हैस व 1 रेडा किं. अं. 22,000/- रु. असे एकूण 03 लक्ष 55,000/- रु. किमतीच्या गोवंशाची बेकायदेशीर तस्करी करून वाहतूक करताना मिळून आले.

याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने सदरचे गोवंश इसम शेख जुनेद शेख उस्मान, मु. 31 वर्ष, रा.मुर्तझा कॉलनी, हिमायतनगर, जि. नांदेड याचेकडे घेऊन जात असल्याचे सांगितल्याने रविकांत गंगारेड्डी बारोट्टीवार, हि.40 वर्ष, रा. मांडवा, ता. किनवट, जि.नांदेड, शेख जुनेद शेख उस्मान, मु. 31 वर्ष, रा. मुर्तझा कॉलनी, हिमायतनगर, जि.नांदेड या आरोपीतांविरूध्द (सी) (डी) (एफ) प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 प्रमाणे व प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(a), 5(b) सह कलम 47 (अ), 48,50,56 (c) प्राण्यांचे वाहतुक नियम 1978 सह कलम 125 (E) MV Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच जप्तीतील 06 गोवंश सुरक्षिततेकामी गोशाळेत पाठविण्यात आले आहे. तसेच पिवळ्या रंगाच्या टाटा एस टेम्पो पंचनाम्यांतर्गत ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणण्यात आला असून, पाहिजे आरोपी शेख जुनेद शेख उस्मान याचा शोध चालू आहे. या गुन्ह्यात एकूण 06 गोवंश कि. अं. 56,000/- रु., व पिवळ्या रंगाच्या टाटा एस टेम्पो कि. अं.02,80,000/- रु. अशी एकूण 03 लक्ष 36,000/-रुपयाची मालमत्ता हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या दोन्ही कारवाया अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड, खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर, श्रीमती शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर, सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे, सपोउपनि. शंकर जाधव, पोशि. सदावर्ते यांनी केली आहे.