क्राईमनांदेड

Combing operation in Chikhli in Kinwat taluka : किनवट तालुक्यातील चिखली मध्ये कोंबिंग ऑपरेशन

किनवट, परमेश्वर पेशवे| पोलीस स्टेशन किनवट हद्दीतील चिखली (बु.) येथे आज दिनंक 31/1/2025 रोजी पोलीस विभाग, वन विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी डॉ. खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधिक्षक भोकर यांचे नेतृत्वाखाली संयुक्त पणे कोंबिंग ऑपरेशन (Combing operation in Chikhli in Kinwat taluka) राबवले.

सदरची कार्यवाही पहाटे 04:30 ते 07:00. दरम्यान करण्यात आली. कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहीजे फरारी आरोपी, सागवान तस्कर, वाहन चोर यांना चेक करण्यात आले. चिखली गावाचे शेजारील गावांमधील राखीव जंगलातील सागवानी झाडांची अवैध कत्तल करुन त्याचे घरात व घराशेजारी ठेवलेला अंदाजे 7 ते 8 लाखाचा 200 घनफुट अवैध सागवान लाकडाचा साठा, सागी कट साईज व इमारती सागी गोल माल जप्त करण्यात आला. तीन वाहने जप्त करण्यात आली, तसेच रेकॉर्डवरील आरोपी चेक करण्यात आले. सदरची कारवाई करीत असतांना सरकी कामात अडथळा आणल्यामुळे 25 ते 30 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपवन संरक्षक केशव वाबळे, उपवन संरक्षक बि.एन. स्वामी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांचे निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डॉ. खंडेराव धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी , सहाय्यक वनसंरक्षक गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड, रोहीत जाधव, सचिन धनगे, उमेश ढगे, अमोल काशिकर मोटार वाहन निरीक्षक तापकीर, पोलीस निरीक्षक बिलां, चोपडे, काशीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे, जाधवर, पीएसआय झाडे तसेच पोलीस विभाग, वनविभाग, प्रादेशीक परिवहन विभाग यांचे 200 ,250 इ सहभाग घेतला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button