नांदेडमहाराष्ट्र

Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा

हिमायतनगरात नाली काम बंद

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नाली बांधकामातील कथित भ्रष्टाचारावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने थेट अॅक्शन घेत काम बंद पाडले. वारंवार तक्रारी करूनही ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी धडक देत ठेकेदाराला जाब विचारला.

तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वीच संबंधित अभियंता देशपांडे यांना काम थांबवण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून “अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करू” असे आश्वासन दिले. मात्र, काही दिवसांतच पुन्हा त्याच पद्धतीने थातुरमातुर काम सुरू झाल्याचे समोर आले.

यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीने पुन्हा घटनास्थळी जाऊन काम थांबवले आणि “अभियंता स्वतः उपस्थित राहून दर्जेदार काम केले तरच काम सुरू होईल, अन्यथा आंदोलन छेडू,” असा थेट इशारा दिला.

IMG 20260412 185727 Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा
Oplus_16908288

एका तासात उखडले काँक्रीट — कामाचा दर्जा उघड प्रत्यक्ष पाहणीदरम्यान टाकलेले काँक्रीट काही तासांतच उखडू लागल्याचे दिसून आले. यावरून काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे, याचा अंदाज येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. व्यापाऱ्यांनीही संताप व्यक्त करत “शासनाच्या पैशाची उघड लूट सुरू आहे,” असा आरोप केला.

रस्त्याची रुंदी कमी; अपघातांना निमंत्रण जुनी नाली सोडून नवीन नाली रस्त्याच्या बाजूला आणल्याने आधीच अरुंद झालेला रस्ता आणखी कमी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

IMG20260412182011 01 Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा
oplus_0

“ठेकेदारांचा मनमानी कारभार थांबवा” — नागरिकांचा सवाल संपूर्ण प्रकरणात ठेकेदार आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “कोट्यवधींचा निधी खर्च करूनही निकृष्ट काम का?” असा थेट सवाल नागरिक विचारत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन दर्जेदार काम करून नागरिकांना सुरक्षित सुविधा देणार का, की पुन्हा आश्वासनांचीच मालिका सुरू राहणार? याकडे संपूर्ण हिमायतनगरचे लक्ष लागले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!