Saturday, May 30

Tag: “Stop the

Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा

Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नाली बांधकामातील कथित भ्रष्टाचारावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने थेट अॅक्शन घेत काम बंद पाडले. वारंवार तक्रारी करूनही ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी धडक देत ठेकेदाराला जाब विचारला. तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वीच संबंधित अभियंता देशपांडे यांना काम थांबवण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून “अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करू” असे आश्वासन दिले. मात्र, काही दिवसांतच पुन्हा त्याच पद्धतीने थातुरमातुर काम सुरू झाल्याचे समोर आले. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीने पुन्हा घटनास्थळी जाऊन काम थांबवले आणि “अभियंता स्वतः उपस्थित राहून दर्जेदार काम केले तरच काम सुरू होईल, अन्यथा आंदोलन छेडू,” असा थे...
error: Content is protected !!