उस्माननगर। शिराढोण ता.कंधार येथील जेष्ठ नागरिक सुपरिचित असलेल व्यक्तीमत्व तथा दैनिक प्रजावाणी चे पत्रकार शिवकांत डांगे यांचे वडील कै.कोंडिबा गणपती डांगे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने गरजू रूग्ण लाभार्थ्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण येथे नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले , यास गरजू लाभार्थ्यांनी उपस्थिती लावून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
पशुवैद्यकीय दवाखाना कापसी ता.लोहा येथे परिचर म्हणून सेवा बजावलेले व परिसरात सुपरिचित असलेल व्यक्तीमत्व कै.कोंडिबा डांगे यांनी आयुष्यभर पशुधनाची सेवा केली. अत्यंत प्रेमळ व शांत , मनमिळावू स्वभावाचे कै.कोंडिबा डांगे आपल्यात नसल्याचा कुणालाही विश्वास बसत नाही.
त्यांच्या पश्चात आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दात हेतूने गावातील गोरगरीब नागरिकांना गावातच नेत्र तपासणी करण्यात यावी म्हणून श्री साई दृष्टी नेत्रालय नांदेड येथील तज्ञ डॉ. मनोहर गोरे सर, कंम्प्युटर दर्शक प्रदिप जाधव, शेख चाँद यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे चिरंजीव गणेश डांगे , पत्रकार शिवकांत डांगे , यांनी शिबिराचे आयोजन केले. कै.कोंडिबा डांगे यांच्या प्रतिमेचे पुजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी मारोतराव पांचाळ , नागोराव पाटील पांडागळे , दादाराव पाटील पांडागळे , बाबाराव पाटील पांडागळे , शुभम डांगे , सुनिल भुरे , रामू आप्पा देवणे , शिवाजी बोदकुले , बालाजी टिमकेकर यांच्या सह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी परिसरात रुग्णांनी सकाळ पासून तपासणी साठी गर्दी केली होती. नेत्र तपासणी करून डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.यास लाभार्थ्यांनी उपस्थिती लावून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.