Kondiba Dange : कै. कोंडिबा डांगे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने शिराढोण येथे नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL
उस्माननगर। शिराढोण ता.कंधार येथील जेष्ठ नागरिक सुपरिचित असलेल व्यक्तीमत्व तथा दैनिक प्रजावाणी चे पत्रकार शिवकांत डांगे यांचे वडील कै.कोंडिबा गणपती डांगे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने गरजू रूग्ण लाभार्थ्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण येथे नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले , यास गरजू लाभार्थ्यांनी उपस्थिती लावून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
पशुवैद्यकीय दवाखाना कापसी ता.लोहा येथे परिचर म्हणून सेवा बजावलेले व परिसरात सुपरिचित असलेल व्यक्तीमत्व कै.कोंडिबा डांगे यांनी आयुष्यभर पशुधनाची सेवा केली. अत्यंत प्रेमळ व शांत , मनमिळावू स्वभावाचे कै.कोंडिबा डांगे आपल्यात नसल्याचा कुणालाही विश्वास बसत नाही.
त्यांच्या पश्चात आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दात हेतूने गावातील गोरगरीब नागरिकांना गावातच नेत्र तपासणी करण्यात यावी म्हणून श्री साई दृष्टी नेत्रालय नांद...
