Market Committee : बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिव यांच्यासाठी प्रशिक्षण 

WhatsApp Image 2025 07 01 at 6.01.19 PM 1 Market Committee : बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिव यांच्यासाठी प्रशिक्षण 

Training for the Board of Directors and Secretary of the Market Committee नांदेड| महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे व एनआयपीएचटी तळेगाव दाभाडे, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नांदेड जिल्ह्यातील बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिव यांचे प्रशिक्षण हॉटेल ग्रँड तुलसी, आनंदनगर येथे संपन्न झाले.

नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 17 कृषि उत्पन्न बाजार समित्या असून त्यांचे एकूण 306 पदाधिकाऱ्यापैकी 130 पदाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षणात 160 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 6 सभापती, 10 उपसभापती, 98 संचालक व 16 सचिव यांनी सहभाग नोंदविला.

WhatsApp Image 2025 07 01 at 6.01.18 PM 1 Market Committee : बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिव यांच्यासाठी प्रशिक्षण 

या प्रशिक्षणाच्या प्रारंभी पणन मंत्री महोदय यांच्या शुभ संदेशाच्या व्हिडीओ क्लीप दाखविण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे व सहसंचालक साखर विश्वास देशमुख यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार फी वसुली अनुषंगाने मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी जिल्ह्यातील कृषि उत्पादने व नियमन याविषयावर मार्गदर्शन केले. तर पणन मंडळाचे विभागीय उपव्यवस्थापक महादेव बरडे यांनी पणन मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. एनआयपीएचटी व्यवस्थापक रविंद्र देशमुख यांनी संस्थेची माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top