हिमायतनगर| येथील गोल्ला-गोलेवार यादव महासंघ तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून लकडोबा चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड व जिल्हा परिषदेचे कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकजी कासराळीकर होते. उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुभाषराव शिल्लेवाड यांच्या हस्ते झाले. तर अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड होते. शहराध्यक्ष श्यामजी जक्कलवाड यांनी मार्गदर्शन केले. युवक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अभिषेक बकेवाड यांनी प्रमुख आयोजक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.


प्रदेशाध्यक्ष आक्केमवाड यांनी प्रतिपादन केले की, “रक्तदान हेच खरे जिवदान आहे. जगात अनेक तांत्रिक शोध लावले जात आहेत, पण आजपर्यंत रक्त तयार करण्याचे तंत्रज्ञान कुणालाही साध्य झाले नाही. त्यामुळे रक्तदानाची गरज समाजाला कायम राहणार आहे. हिमायतनगरातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेली ही संकल्पना समाजासाठी आदर्श ठरेल.


या उपक्रमाला पोलीस निरीक्षक भगत साहेब, वैद्यकीय अधिकारी वानखेडे साहेब, तसेच जेष्ठ समाजसेवक प्रकाशजी करेवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण शैनेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी सरपंच शिवाजी बोट्टेवाड यांनी केले. स्थानिक समाज बांधवांनी या उपक्रमाचे स्वागत करत, रक्तदान शिबिर भविष्यातील कार्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.



