HomeनांदेडTree plantation : स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत नांदेड विभागात वृक्षारोपण कार्यक्रम

Tree plantation : स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत नांदेड विभागात वृक्षारोपण कार्यक्रम

नांदेड| स्वच्छता ही सेवा 2025 अभियानाअंतर्गत आज नांदेड विभागीय कार्यालय संकुलातील (DOC) गोदावरी गार्डन येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मंडल रेल्वे व्यवस्थापक  प्रदीप कामले, अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक आर. के. मीणा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी अधिकारी वर्गाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. मंडल रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी स्वच्छ आणि हरित पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

IMG 20250923 WA0028 Tree plantation : स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत नांदेड विभागात वृक्षारोपण कार्यक्रम

याचबरोबर नांदेड विभागातील विविध स्थानकांवर तसेच रेल्वे वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्वच्छता ही सेवा 2025 हे अभियान भारतीय रेल्वेत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छता, जनजागृती आणि शाश्वत विकास यावर विविध कार्यक्रम घेतले जात आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments