Saturday, June 27

Tag: Tree plantation program in Nanded division

Tree plantation : स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत नांदेड विभागात वृक्षारोपण कार्यक्रम

Tree plantation : स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत नांदेड विभागात वृक्षारोपण कार्यक्रम

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| स्वच्छता ही सेवा 2025 अभियानाअंतर्गत आज नांदेड विभागीय कार्यालय संकुलातील (DOC) गोदावरी गार्डन येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मंडल रेल्वे व्यवस्थापक  प्रदीप कामले, अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक आर. के. मीणा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी अधिकारी वर्गाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. मंडल रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी स्वच्छ आणि हरित पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. याचबरोबर नांदेड विभागातील विविध स्थानकांवर तसेच रेल्वे वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्वच्छता ही सेवा 2025 हे अभियान भारतीय रेल्वेत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबविण्यात येत आहे. या उपक...
error: Content is protected !!