मा.खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष कार्यवृतांन्त सुनिल रामदासी यांनी लिहिलेला लेख…


नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय मा. खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब. ज्यांना खूप दूरवरचे दिसते ते केवळ त्यांचे नेत्र निर्दोष असतात म्हणून नव्हे, तर ती दूरदृष्टी त्यांच्या हृदयात पेटलेल्या महत्त्वाकांक्षे मुळे आहे. त्यांच्या इच्छा लक्ष्याच्या प्राप्तीसाठी अविरत गतिशील असतात. त्यांचा श्वास निर्धाराला जिवंत ठेवण्यासाठी चालू असतो हृदयाच्या अस्तित्वासाठी नसतो.अशा ध्येयवादी व्यक्तिमत्त्वाचे जीवन लक्ष्य साध्यासाठीच धगधगत असते. त्यांच्या हृदयाला कान लावून ऐकायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यातून ध्येयध्वनीचा अंतर्नाद ऐकू येऊ लागतो.अशी व्यक्तिमत्वे शब्दकोशातून ” अशक्य ” हा शब्द कायमचा मिटवून टाकण्यासाठी अखंड लढणारे धैर्य धुरंदर योद्धे असतात. त्यांचे केवळ स्मरणही आळसी मनात चैतन्याचे बीजारोपण करणारी संजीवनी असते.


असेच थोर व्यक्तिमत्व म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय मा. खासदार तथा आमदार चिखलीकर साहेबा ज्यांच्या मनात सदैव जनतेच्या विकासाचा विचार असतो जे सदैव जनतेसाठीच कार्यरत आहेत मी जनतेचा जनता माझी याप्रमाणे नांदेड लोकसभा परिक्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचे कार्य ज्यांनी आपल्या आजवरच्या कार्यकाळात केले ते विकासाचे महामेरू लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे.व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रंजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार याचे विश्वासू सहकारी म्हणजेच ज्यांच्या नावातच प्रताप पराक्रम शौर्य वीरता सर्वोच्च ध्येय साध्य करण्याची क्षमता असे प्रतापरावजी पाटील चिखलीकर नांदेडच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ध्येयप्रवण तेजस्वी सूर्य अशा ध्येयप्रवण सूर्याच्या सर्वव्यापी कार्याला मानाचा मुजरा व वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.


ज्यांनी विद्यार्थीदशेपासूनच आपल्या संघटन कार्याला एक मोठी दिशा दिली आणि ज्या वयात मुलं खेळण्यांमध्ये रमतात त्या वयात म्हणजे वयाच्या अगदी एकविसाव्या वर्षात ग्रामविकास शिक्षण संस्था चिखली या संस्थेची स्थापना करून गोरगरीबांना वंचितांना शिक्षणाची दारे उघडून दिली ते आहेत नांदेड जिल्ह्याचे मा. खासदार तथा विद्यमान आमदार लोकनेते जननायक लोकनायक प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर.
साहेबांचा राजकीय प्रवास हा त्यांच्या गावापासून सुरू होतो.

राजकीय प्रवास…..1 989 साली चिखली गावचे सरपंच, 1992 कृषि पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती जिल्हा परिषद नांदेड सभापती, 1993 कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना लिमिटेड गांधीनगर चे संचालक
1994 मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कार्यकारिणी सदस्य
1997 शिक्षण व आरोग्य समिती जिल्हा परिषद नांदेड सभापती
2001 अर्थ व बांधकाम समिती जिल्हा परिषद नांदेड सभापती
2001 लोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष
2002 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड उपाध्यक्ष
2002 जिल्हा परिषद सदस्य
2004 कंधार लोहा विधानसभा मतदार संघातून आमदार या काळात विविध विकास कामांवर साधारण साडे पाचशे कोटींचा निधी खर्च
2005 कंधार नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर कार्यकर्त्यांची वर्णी
2007 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणून सत्तास्थापनेचे शिल्पकार
2008 लोहा नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या विजयाचे शिल्पकार
2009 कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा निवडणुकीत 18 पैकी 15 संचालकांना निवडून आणण्याचे कार्य
2014 कंधार लोहा विधानसभेवर पुन्हा आमदार
2019 नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार
2019 आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे नांदेड शहरात आयोजन करून नांदेड शहराला आंतरराष्ट्रीय पटलावर रेखांकित करताना गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.
2024. विधानसाभा सार्वत्रिक निवडणूकीत लोहा-कंधार चे आमदार
2025 .समिती प्रमुख. उपविधान समिती प्रमुख मुंबई.
असा वादळी राजकीय प्रवास साहेबांनी केला आहे. साहेबांचा झंझावात, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, जनतेचे आशीर्वाद आणि पाठबळ यामुळे आज नांदेड जिल्ह्यातील अनेक विकास कामांना गती आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना भेटता यावे, बोलता यावे, त्यांच्या प्रश्नांची त्वरित दखल घेता यावी यासाठी साहेबांनी भव्य संपर्क कार्यालय उभे केले आहे. साहेबांच्या भेटिला जो कोणी येतो, प्रश्न मांडतो, साहेब त्वरित संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना प्रत्यक्ष संवाद साधून तो प्रश्न निकाली काढतात. प्रश्न कौटुंबीक असो गाव गाड्या चा असो वादावादी भांडण-तंटा चा असो विकासकामांचा असो व्यापारी वर्गाचा असो शैक्षणिक आरोग्य सुविधेचा असो किंवा लाईट चा डीपी चा असो आज पर्यंत साहेबांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. जो जे वांछील तो ते देण्याचा प्रयत्न साहेबांनी प्रामाणिकपणे केला आहे.
सूक्ष्म नियोजन, संपूर्ण अभ्यास, सर्वधर्मसमभावाची भावना आणि मार्ग काढण्याची हातोटी साहेबांच्या कार्याचे गमक ठरले आहे. संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य, व्यापार, शेती, उद्योग अशा अनेक विषयांवर साहेबांनी दीर्घकाळ काम केले आहे. मागील वर्षी कोरोणामुळे जनता हैराण झाली. गोरगरिबांच्या जीवनावर संकट आले. अशावेळी साहेबांनी अन्नधान्यासह अनेक मार्गांनी मदतीचा हात देऊन त्यांना वर आणले आहे.लिबोटी धरणाचा प्रश्न पंचवीस वर्षे प्रलंबित होता त्यासाठी आपल्या आमदारकीच्या काळात साडेपाचशे कोटींचा निधी आणून तो पूर्ण केला. किवळा, धोंड हे ही प्रकल्पासाठी कटीबद्ध आहेत.नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी साहेबांचे प्रयत्न फळाला आले आहेत.मुंबईला जाणे सुकर व्हावे म्हणून राज्यराणी एक्सप्रेस नांदेड हुन सुरू करण्यात त्यांनी यश मिळवले परभणी मुदखेड दुहेरी मार्गाचे हे काम पूर्ण झाले आहे.नांदेड ते बिदर व बोधन ते लातूर रेल्वे चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सर्व धर्मांना सोबत घेऊन त्यांच्या कल्याणासाठी काम करणे ही साहेबांची मनीषा सफल होत आहे. सबका साथ सबका विकास या धोरणापासून साहेब तसूभरही दूर नाहीत. माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा, महाराष्ट्राचे मुंख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस.उपमुंख्यमंत्री तथा रा.काँ.प.अध्यक्ष अजितदादा पवार.रा.काँ.प.महाराष्ट्राचे अध्यक्ष आ.सुनिल तटकरे.मा.प्रफुल पटेल यांच्या भक्कम पाठिंब्यावर आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी व्यापारी नागरिक यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने साहेबांच्या कर्तृत्वाला आणखी झळाळी येवो आणि नांदेड जिल्ह्यातील समाजाच्या सर्व वर्गांसाठी कल्याणाचे, समृद्धीचे, भरभराटीचे मार्ग प्रशस्त होवो हिच साहेबांच्या राजकीय कार्यास व वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!!
चिखलीकर साहेब म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व…..उजाड ओसाड रानावर ज्ञानबाग फुलविणारे ,दिलेल्या शब्दाला जागणारे,बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या ओळी ज्यांना सार्थपणे लागू पडतात ते नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते हजारो जणांना अनमोल मदत करणारे गोरगरिबांच्या लेकरांची समस्या जाननारे व त्याना प्रोत्साहन देणारे आमचा मान सन्मान स्वाभिमान एक ज्ञानप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय मा.खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब.
आदरणीय साहेब,तुमच्या सहवासात, संस्कारात मनाच्या अंगणात उत्साहाचे चांदणे सतत बरसत असते,आकाशाच्या चांदव्याला ताऱ्यांचा प्रकाश आणि नक्षत्राची तेजस्विता लगडून जाते. अनमोल ज्ञानाने आनंदी मनात अमावस्या वास्तव्याला कधीच राहत नाही आणि भौतिक सृष्टीचे लौकीक नियम मानवी मनाच्या प्रतलावरून कायमचॆ दूर होतात. आपण उत्साही अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने विद्यार्थ्यांना दिलेल्या शिकवणुकीमुळे जीवनातील प्रत्येक रात्र पौर्णिमा होऊन जाते. असे जीवन दुर्मिळ आनंद प्रफुल्ल उल्हास आणि गंधभरल्या चैतन्याने आनंदून जाते.
रंजल्या गांजल्यांसाठी आपण चंदनासम झिजल्याने, अविरत कष्टाने त्या विद्यार्थ्यांच्या कार्यात उत्साह संचारतो त्या उत्साहाचा सुंदर सकारात्मक जीवन घडविण्यासाठी निश्चितच लाभ होतो. आपल्या निर्मोही वागण्याने सळसळता उत्साह पंचेइंद्रियांना कार्यशील कार्यमग्न ठेवून सत्कर्म करण्यासाठी अक्षय सूर्यऊर्जा पुरवत असतो. सततच्या प्रेरणादायी शब्दाने माझ्यासह अनेकांच्या जीवनातील प्रगतीचे सारे मार्ग प्रशस्त होत जातात. खेड्यापाड्यात राहणाऱ्या वाडीवस्तीत जीवन व्यतीत करून ज्ञानार्जन करणाऱ्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांना तुम्ही सर्वश्रेष्ठ विद्यापीठ वाटता आणि आहातही.
प्रामाणिकपणा नम्रता, शिस्त विद्वत्ता या गुणांनी तुम्ही शोभून दिसता. आजच्या युवकांसाठी आदरणीय साहेब आपण अनमोल आदर्श आहात. आपले आदरणीय पिता शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांनी अविरत प्रयत्नांनी गोरगरिबांच्या लेकरांसाठी ज्ञान दरवाजे उघडे केले त्याप्रमाणे आपणही त्यांची सुंदर परंपरा चालवत आहात. लोकसभेत आसताना पंतप्रधान नरेन्द्रं मोदीजी साहेबांचे विश्वासू खासदार म्हणून यश संपादन केले हि बाब आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.
आनंदात ऐश्वर्यात जीवन जगणेऐवजी कष्टकऱ्यांच्या, रंजल्या गांजल्यांच्या लेकरासाठी धावून जाता हा आपला गुण आम्हा सर्वांसाठी फार मोठे कार्य करण्याची ऊर्जा देणार आहे. शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची लेकरं मेहनतीने गुण प्राप्त करतात त्यांना प्रोत्साहन दिल. क्षेत्रातील अडचणी दूर केल्या दिल्ली सारख्या ठिकाणी आपल्या नांदेडच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी याकरता निवासाची राहण्याची व्यवस्थाआपण केली. संत तुकाराम महाराज लिहितात “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” आपण अगदी असेच आहात.सर्वजण स्वतःसाठी जगतात पण तुम्ही मात्र इतरांसाठी जगता इतरांच्या घरांमध्ये ज्ञानदीप तेवण्यासाठी आपण आजही खूप कष्ट करता तेव्हा हृदय भरून येते आणि आपल्यात उद्याचे स्वामी विवेकानंद, साने गुरुजी, इत्यादी महानपुरुष आम्हाला दिसायला लागतात. आपले हे कार्य महान आहे. मानवतेचे उत्तम उदाहरण आहे .आपले कार्य ही खऱ्या अर्थाने परमेश्वराची पूजा आहे.
चिखलीकर साहेब याची नैसर्गिक आपत्तीत अनेकांना मदत रुपी सेवा.. आपल्या भारतीय संस्कृतीने परोपकार हे पुण्य तर परपीडा ही पाप मानले आहे. परोपकाराचा अर्थ सेवा आहे निरमोही मनाने,निर्मळ अंतकरणाने अनाथाचा नाथ व्हावे भुकेल्या व्यक्तीला भाकर द्यावी पंगो व्यक्तीला आधार द्यावा तर आडल्या नडलेल्याच्या कामाला कुठलाही स्वार्थ न ठेवता उपयोगी पडावे या सर्वच गोष्टींमध्ये सेवा आहे आपण प्रामाणिकपणे जर कोणतीही सेवा केली तर निसर्ग आपल्याला सुख प्रदान करत असतो म्हणजे आपल्या व्यक्तिमत्व विकास करण्याचे पैलू निर्माण करतो या देशाच्या प्राचीन भूमीमध्ये विकासाचे नांदेड जिल्ह्याचे महामेरू असलेल्या आदरणीय मा. खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी अनेकांना सुख-दुःखाच्या प्रसंगी मदत करून त्यांची सेवा करून सेवेचा आदर्श घालून दिला आहे प्राचीन भारताचा इतिहास जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा त्या कालखंडात अनेक ऋषीमुनींनी ज्ञानदानाच्या माध्यमातून या देशाच्या भावी पिढीला घडवून एक प्रकारची ज्ञान सेवा केली आहे आपण लोकांची सेवा करावी याकरिता एका कवींनी सुंदर लिहिले आहे “सूर्यकुलाशी नाते ज्यांचे त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगांचा अंधार जिथे पहाटेचा गाव न्यावा ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे” या सर्वच गोष्टींमध्ये सेवेचा अर्थ लपलेला आहे.
निष्काम भावनेने केलेले कार्य म्हणजे सेवा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञान तपश्चर्याने समस्त मानवांना अमृत करून उपदेश केला आणि धुरीतांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांशील तो तेला हो प्राणी जात या भावनेत सेवाभाव व्यक्त झाला आहे नंतरच्या कालखंडात अनेक पंडित कवींनी शाहिरांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून सेवेचा खरा अर्थ सांगितला कर माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला विसरू नको रे भल्या माणसा तुझ्या तो आई बापाला हा खरा सेवेचा भाव आहे.
झाडे ऊन वादळ पाऊस वारा यांचा मारा सहन करून थंडसावली गोड फळे देतात चंदन स्वतः झिजून इतरांना सुगंध देत नद्या स्वतः वाहून इतरांची तहान भागवतात धरती सुजलाम सुफलाम करतात ही सर्व निसर्गातील उदाहरणे आपणास सेवाभाव सांगत असतात स्वर्गीय बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली.मदर तेरेसा यांनीही इतरांना मदतीचा हात दिला राष्ट्रसंत गाडगेबाबा राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांनी सदैव सेवाभाव जागा केला राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. तर सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांची माय होत निराधार लेकरांना आधार दिला मायेचे वाचले आणि प्रेम दिले सेवा ही परोपकाराच दुसरे नाव आहे म्हणून आपण इतरांच्या मदतीला धावून जावं इतरांची मदत करावी ज्ञानी माणसाने अज्ञान संपविणे म्हणजे सेवा श्रीमंत माणसाने एकदाच दारिद्र्य संपविणे म्हणजे सेवा एखाद्या सर्वोत्कृष्ट कीर्तनकाराने निर्मळ अंतःकरणाने प्रबोधन करून अनेकांचे जीवनामध्ये ज्ञानप्रकाश पसरविणे म्हणजे सेवा. सेवेचे अनेक अर्थ आहेत आजही समाजात सेवा करणारी माणसं निश्चितच कार्यरत आहेत म्हणूनच म्हटले गेले आहे सर्विस तो मॅनेज सर्विस टू गॉड अर्थात मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा.
आज समाजात सेवाभावाला कमी नाही हजारो लोक विविध मार्गाने सेवा करत आहे कोणी मोठमोठी दवाखाने उभा करून गोरगरीब लोकांसाठी मोफत उपचार करतात कोणी अन्नछत्राच्या माध्यमातून भुकेल्या लोकांची भूक भागवतात कोणी उन्हाळ्यात पाणपोया लावून तहान भागवतात कोणी मानवी जीवनातील दुःख दूर करत करत खराी सेवा निभावत असतात सेवा करणे म्हणजे आपल्या अंतकरणाला समाधान प्राप्त करून घेणे होय महात्मा गांधी म्हणतात सेवेतच देव आहे सेवा हाच भाव आहे आणि म्हणून जो कोणी व्यक्ती निर्मळ मनाने इतरांची सेवा करतो त्याच व्यक्तीत परमेश्वर वास करत असतो ते नाव आहे आदरणीय मा.खासदार तथा आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचे आपल्या मतदारसंघातीलच नाहीतर संपूर्ण नांदेड जिल्हा व त्या बाहेरील ज्या कुण्या व्यक्तीला शेतात काम करताना विंचू साप चावला त्यांना चटकन मदत मिळून दिली कोणी बीज पडून अपघाती मृत्यू पावले अशा सर्वांना आदरणीय साहेबांनी मदत केली आणि जनसेवेचा वसा घालवून दिला.
चिखलीकर साहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व…माजी.खासदार तथा विद्यमान आमदार साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे.. ते दिल्लीत गेले पण तेथे कधीच स्थिरावले नाही. त्यांनी गल्लीशी असलेली आपली नाळ कधीच तुटू दिली नाही. ज्यांच्या जीवनाचे सार हे संघर्ष आहे असा ध्येयवेढा कर्तबगार लोकनेता मा. म्हणजे मा. खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर. तळागाळातील लोकांसाठी एक भरीव कार्य करणारे साहेब म्हणजे आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी झटणारा नेता म्हणजे प्रतापरावजी पाटील चिखलीकर. कार्यकर्त्यांचा जीव की प्राण असणारा नेता म्हणून आणि एका हाके वर हजारो कार्यकर्ते गोळा करणारा नेता म्हणून ज्यांचे मोठी ओळख आहे असे साहेब म्हणजे मा.आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर. आणि यामुळेच राजकारणातील एका उंचीवर साहेब पोहोचले आहेत. लोकसभेसारख्या सर्वोच्च सभागृहात साहेब आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व केले व सद्या महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य म्हणजे आमदार म्हणूनही कार्य चालु आहे. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण साहेबांची नाळ ही या मातीशी जोडलेली आहे. इथल्या प्रत्येक प्रश्नांची जाण साहेबांना आहे त्यामुळेच जनसामान्यांचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपण त्यांच्याकडे हे नेतृत्व सोपवलेलं आहे.
मैत्री जपण्याची एक विलक्षण हातोटी आदरणीय मा. खासदार तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये आहे.मैत्रीला नि:स्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र. असा त्यांचा त्यांच्या मित्रपरिवारात लौकिक आहे.
कार्यकर्त्याने अगर एखाद्या नेत्याने कानात सांगितलेले त्यांना अजिबात आवडत नाही. जे आहे ते स्पष्टपणे समोर बोला हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनोखा पैलू आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर खोटे बोलता येत नाही. एखाद्या कार्यकर्त्याने दुसऱ्याविषयी चुगली अथवा चाडी केलेली त्यांना अजिबात खपत नाही अशा कार्यकर्त्याला ते दूरच ठेवतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी विलक्षण धाक आणि आदरयुक्त मान आहे.स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू. एखाद्या पक्षाच्या प्रमुखापासून ते समपातळीवरील नेत्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांसमोर ही ते अत्यंत स्पष्टपणे व परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेली मते, घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी त्या निवडणुकीचे सर्वोत्तम व्यवस्थापन हा आजच्या राजकारणाचा विजयी मंत्र आहे.
चिखलीकर साहेबांची कोरोना काळातील जनतेसाठी भरीव मदत… जगाच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणता काळ अतिशय बिकट काळ म्हणून ओळखला जाईल? असा प्रश्न जेव्हा विचारल्या जाईल तेव्हा त्याचे उत्तर कोरोना काळ असेच म्हणावे लागेल. या अत्यंत बिकट काळात मा. खासदार तथा आमदार चिखलीकर साहेबांनी गोरगरीब गरजू नागरिकांसाठी भरीव कार्य करून लोकसेवा केली.
नागरिकांसाठी हा काळ अत्यंत भीतीदायक आणि जीवघेणा असा होता. आरोग्य विषयक अनेक प्रश्न सोबतच कुणालाही कामासाठी घराबाहेर पडता येत नसल्यामुळे सर्वसामान्यांसाठी जगण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. जगावर आलेल्या या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. कोरोना काळात तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक होते. या काळातील लॉकडाऊन काळ तर सर्वसामान्यांसाठी अतिशय कठीण होता.अशा परिस्थितीत अनेक कुटुंबातील चुली पेटणेही अवघड होते. अशा परिस्थितीत साहेबांनी अनेकांना मदत केली.
प्रशासकीय यंत्रणा आणि कार्यकर्ते या सर्वांना हाताशी धरून खासदार साहेबांनी गरजू जनतेस आवश्यक ती मदत पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. विविध भागात नागरिकांना अन्नधान्याच्या कीट पुरविणे, रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरविण्यास मदत करणे. आपल्या भागात निर्माण झालेल्या परिस्थितीवर करडी नजर ठेवून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करणे. कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या माध्यमातून लोकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती करणे, असे भरीव कार्य साहेबांनी केले. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील रुग्णांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून दोन कोटींची भरीव मदत उपलब्ध करून दिली. या खेरीज अत्यंत गंभीर अशा या संकट काळात ते शेतकरी शेतमजुरांच्या हाकेला धावून गेले.
चिखलीकर साहेब म्हणजे दूरदृष्टी असलेले चाणाक्ष नेतृत्व…
मा.खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब म्हणजे उत्तम राजकीय व्यवस्थापनाचे कौशल्य, नावीन्याचा ध्यास आणि दूरदृष्टीचे वरदान, राजकारणातील जाणकार ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. समाजकार्यासाठी सतत नाविन्याच्या शोधात दूरदृष्टीने आणि चाणाक्षपणे ते विकासकामांची बांधणी करत आहेत, तर सत्तेच्या राजकीय सारीपाटात एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे कोरोनाच्या संकट काळात मानवतेचे पवित्र कार्य त्यांनी ”आरोग्यदूत” बनून सत्यात उतरवले.
मैत्री जपण्याची एक विलक्षण हातोटी आदरणीय मा. खासदार तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये आहे.मैत्रीला नि:स्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र. असा त्यांचा त्यांच्या मित्रपरिवारात लौकिक आहे. कार्यकर्त्याने अगर एखाद्या नेत्याने कानात सांगितलेले त्यांना अजिबात आवडत नाही. जे आहे ते स्पष्टपणे समोर बोला हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनोखा पैलू आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर खोटे बोलता येत नाही. एखाद्या कार्यकर्त्याने दुसऱ्याविषयी चुगली अथवा चाडी केलेली त्यांना अजिबात खपत नाही अशा कार्यकर्त्याला ते दूरच ठेवतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी विलक्षण धाक आणि आदरयुक्त मान आहे.स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू. एखाद्या पक्षाच्या प्रमुखापासून ते समपातळीवरील नेत्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांसमोर ही ते अत्यंत स्पष्टपणे व परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेली मते, घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात.
चिखलीकर साहेब यांच्या वतीने नेहमीच लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा सन्मान.. नांदेड जिल्ह्याचे मा.खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब म्हणजे अंतरबाह्य निर्मळ मनाचे व्यक्तिमत्त्व. ज्यांनी आपले आयुष्य कष्ट करणाऱ्या सामान्यजणांच्या कल्याणासाठी झिजविण्याचा संकल्प केला आहे. आदरणीय साहेबांचे कार्य हे विस्तीर्ण असे आहे.मा.खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर नावाचं व्यक्तिमत्त्व हा काही एका लेखाचा विषय नाही. एका लेखात सामावणारं मर्यादित कार्य त्यांचं नाही. मा.खासदार तथा आमदार साहेबांनी सर्वच क्षेत्रात आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. साहेबांनी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला खूप महत्त्व दिले आहे. त्यांचा सन्मान होणे, त्याच्यासाठी काहीतरी करणे ही साहेबांची नेहमीच धडपड असते. विविध माध्यमातून मा.खासदार साहेब पत्रकाराना नेहमीच मदतीचा हात देत असतात. कारण मा.खासदार साहेबांना माहित आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे अर्थात पत्रकार हा लेखणीचा जादूगर आहे .
या आधारस्तंभाचा यथायोग्य सन्मान होणे याची जाणीव मा. खासदार साहेबांना आहे. पत्रकार आणि राजकारण हे कधीच एकमेकांपासून अलिप्त राहू शकत नाहीत, पण त्यांच्यात अंतर असणेही गरजेचे आहे. पण प्रत्येक राज्यात, प्रांतात अगदी जिल्ह्यातसुद्धा एक तरी असे स्थानिक वृत्तपत्र असते जे एका राजकीय पक्षाची भूमिका बजावत असते. आपल्या भूमिका मांडत असताना त्यांनी समाजहित आणि देशहितास प्राधान्य देऊनच त्याचा अंगीकार केला पाहिजे हे अपेक्षित आहे.
कुठल्याही नागरिकाला अथवा कामाला कायद्याचे कवच केवळ लोकप्रतिनिधी आणि पर्यायाने सरकार देऊ शकते. पत्रकारितेला अशा कवचाची पूर्वीपेक्षा आज अधिक गरज आहे. पत्रकारिता टिकली तर लोकशाही टिकेल. पत्रकारितेला कायद्याचे कवच देताना काही बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. पत्रकारिता जपणे म्हणजे पर्यायाने पत्रकाराला जपणे. अशी भूमिका नेहमीच मा. खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांची राहिलेली आहे. त्यामुळेच त्यांनी पत्रकारांचा सन्मान करणे, हे आपले कर्तव्य समजतात.
पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो. त्याच्या लेखणीने अनेक गोष्टी बदलू शकतात. त्याच्या लेखणीत समाज व्यवस्था बदलण्याची प्रचंड ताकद असते. पत्रकारांमुळे, अनेक चांगल्या – वाईट गोष्टी ह्या लोकांसमोर येत असतात. सामान्य लोकांना विश्वासू आणि निर्भीडपणे पत्रकारिता करणार्यांचे कौतुक असते. असे पत्रकार असल्यामुळे पत्रकारांनी आणलेल्या बातम्या ह्या वाचकांना पटतात. त्यामुळेच तर पत्रकार आणि जनता यांचे दृढ असे नाते निर्माण होते. समाजात पत्रकार असल्यामुळे सामान्य लोकांच्या समस्या ह्या शासनाला कळतात. पत्रकार, खऱ्या अर्थाने समाजमन घडविण्याचे काम करत असतात.
या सर्व गोष्टींचा आपण एक भाग आहोत याची जाण आदरणीय मा. खासदार तथा आमदार साहेबांना आहे. आणि म्हणूनच एखाद्या प्रसंगाचे औचित्य साधून खासदार साहेब दरवर्षी नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांना विमा सारखे कवच व सन्मान देण्याचे विसरत नाहीत. पत्रकारांविषयी प्रचंड प्रेमाने असतात असल्यामुळे साहेबांविषयी पत्रकारांचे नाते अधिक स्नेहाचे बनते. पत्रकारांनी निर्भीडपणे आपली भूमिका बजावली पाहिजे,असे मा.खासदार व आमदार लोकनेते चिखलीकर साहेबांचे मत असते. मग ती त्यांच्या बद्दलची का असेना.
.. लेखक… सुनिल रामदासी, पत्रकार9 423136441


