Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ December 29, 2024

Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

• पालखी दर्शनाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती • जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक घेतले श्री खंडेरायाचे दर्शन • श्री खंडोबारायावर बेल भंडारा खोबरे उधळून निघाली देवस्वारी व पालखी• हजारोंची अलोट गर्दी ; भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन • प्लास्टिक मुक्त व कचरामुक्त यात्रेचा संकल्प
NNL TeamBy NNL TeamDecember 29, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला. दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली. ‘यळकोट यळकोट’ जय मल्हारच्या गजरात बेल भंडारा, खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. देवस्वारीचे विश्रामगृह येथे आगमन झाले होते.  

यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्या सोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,  आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, अमित राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले, कृषी विकास अधिकारी सचिन कपाले, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज,  पंचायत समिती दशरथराव आडेराघो,  सरंपच प्रतिनिधी हनुमंत हुलगंडे,  ग्रामपंचायत अधिकारी बी. सी. देवकांबळे,  ग्रामपंचायतचे पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.

यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाजन (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण),  खुशालराव भगवानराव भोसीकर (पानभोसी) व गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायण पाटील (माळेगाव),  मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव),  विजयकुमार शंकरराव कनकदंडे (आष्टुर) व अंबादास खंडेराव जहागीरदार (माळेगाव) यांचा देवस्थानच्यावतीने मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.

यावर्षी मंदिराकडे जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता मोकळा केल्याने भाविकांना दर्शनासाठी सहज जाणे शक्य झाले. याचबरोबर यावर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिक सुरक्षितता घेतली जात आहे. तसेच प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने उत्तम नियोजन केलेले आहे. तसेच पार्किंग, सुरक्षा व्यवस्था याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

यावेळी पालखी सोहळ्यात पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळी, वासुदेव, पारंपारीक पध्दतीने कवड्याच्या माळी, लांब हळदीचा मळवट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी सहभागी झाले होते. त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील महत्त्वाच्या उत्सवात सहकार मंत्र्यांसोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते. या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती, माळेगाव ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

आजपासून सुरू झालेली यात्रा  पुढे 5 तारखेपर्यत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. दोन जानेवारीपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. देशभरातील भाविक या ठिकाणी पुढील काळात येणार असून पशुधनाचा मोठा बाजार या ठिकाणी या कालावधीत सुरू होतो. तसेच पशुधन संदर्भातील आवश्यक वस्तू विक्रीचेही दुकाने मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय या यात्रेत देणाऱ्या भाविकांसाठी  2 जानेवारीला लावणी महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध लावणी कलाकार व त्यांच्या अनेक चमू या ठिकाणी आपली कला साजरी करणार आहे.

या यात्रेला कुलदैवताची यात्रा समजणाऱ्या अनेक जमातीचे नागरिक आजपासून या ठिकाणी दाखल झाले आहे. आपल्या पारंपारिक पेहेरावात ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. आजच्या यात्रेदरम्यान भारताच्या ग्रामीण भागातील अनेक कलांचे पालखी महोत्सव दरम्यान नागरिकांनी सादरीकरण केले.

या यात्रेदरम्यान पोलीस विभागाने चोख, बंदोबस्त ठेवला असून मोठ्या प्रमाणात पोलीस दल या ठिकाणी कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उत्तम जागा पाहूनी मल्हाजरी, देव नांदे गड जेजुरी, उत्तुम रायाची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी या जयघोषात माळेगावच्यात यात्रेत पारंपारीक वाद्याने खंडेरायाची सेवा अर्पण करायला सुरुवात केली. पारंपारीक गितासोबत डफ, तुनतुने आणि जयघोषाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमला. उर्वरित नियोजित कार्यक्रम 2 ते 5 जानेवारी पर्यंत होतील.

South India's Mahayatra begins with traditional enthusiasm in Malegaon
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTennis ball Cricket ; उस्माननगर येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यास प्रारंभ -NNL
Next Article District Rank second ; संगणकीकरणात जिल्हा दुसरा ; 64 संस्थांचे संगणीकरण -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

SRTMU Volleyball ; यजमान ‘स्वारातीम’ नांदेड विद्यापीठाची आगेकूच; पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धा – NNL

December 15, 2024

Extension of Nagpur Madgaon Pratiksha : नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २८ फेब्रुवारी२०२५ पर्यंत मुदतवाढ -NNL

December 30, 2024

Intrusion into the reserved constituency! : राखीव मतदार संघातील घुसखोरी ! 

November 7, 2024

गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

June 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Students have to go to Berli (Khu) village through Nadi : बेरळी (खु) गावात विद्यार्थ्यांना जावे लागते नदी पत्रातून; अनेक वर्षाची मागणी पण पूल नाही -NNL

श्री संत सेवालाल महाराज स्मारकाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल

on the way to leave the support of Congress leaders : हिमायतनगरातील काँग्रेसचे निष्ठवंत युवा कार्यकर्ते काँग्रेसच्या साहेबांची साथ सोडण्याच्या मार्गावर -NNL

नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना निट,जेईई मोफत प्रशिक्षणासाठी प्रयत्न करु -आ.जवळगांवकर यांची ग्वाही -NNL

RTO office : आरटीओ कार्यालयातील सेवा मिळणार फेसलेस सुविधेद्वारे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?