नांदेडलाइफस्टाइल

Solve the problem : नाल्याच्या बाजुने होणाऱ्या दुर्गंधीत भराव टाकून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवा

हिमायतनगर| शहरातील शंकर नगर, बजरंग चौक, परिसरातील बांधण्यात आलेल्या नाल्याच्या बाजुने भराव टाकून नागरिकांना सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी. अशी मागणी या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे नगरपंचायतीकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिरंजनी ते पळसपूर रोडपर्यंत नालीचे बांधकाम होऊन सहा महिने झाले असून, केवळ भराव टाकला गेला नसल्याने या भागातील नागरिकांच्या घरात पावसाचे व दुर्गंधीयुक्त पाणी शिरत आहे. केवळ नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणामुळे घाण पाण्याने परिसरात डासांची व सांड अळ्यांची उत्पत्ती होऊन नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ आली आहे.

ghan 1 Solve the problem : नाल्याच्या बाजुने होणाऱ्या दुर्गंधीत भराव टाकून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवा

हि बाब लक्षात घेता तातडीने शंकर नगर, बजरंग चौक, परिसरातील बांधण्यात आलेल्या नाल्याच्या बाजुने भराव टाकून नागरिकांना सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सुभाष गायके, लक्ष्मीकांत बल्लेवार, अंकुश शिंदे, योगेश वानखेडे, शुभम नरवाडे, विकास गाडगेराव, सौरव जाधव, देविदास गंगुलवार, राजू रच्चेवार, उषा यलकेवाड, अमोल चवरे, विजय रच्चेवार आदींसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नागरिकांची तक्रार येण्यापूर्वी नाल्याची सफाई करा – माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड

kunal rathod Solve the problem : नाल्याच्या बाजुने होणाऱ्या दुर्गंधीत भराव टाकून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवाशहरातील शंकर नगर, बजरंग चौक सह शहरातील अन्य प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील स्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाने नागरिकांची तक्रार येण्यापूर्वी शहरातील नाल्याची सफाई करून ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते भरून पावसाळ्यात नागरिकांचा सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी. अश्या सूचना माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी सबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!