Election Officer : निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी -NNL

नांदेड| लोकशाहीमध्ये निवडणूक कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असून दोन दिवसांच्या कामाचा विनाकारण बाऊ कोणी करू नये. अशा प्रकारे प्रशिक्षणासाठी दांड्या कोणी मारत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी सूचना नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केल्या.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोट निवडणूकीसाठी 87 नांदेड दक्षिण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक अनुषंगिक कामाचा आढावा घेतांना यातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी गांभीर्य लक्षात न घेता अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. विशेषतः जी.एस.टी.विभाग, अनेक बि.एल.ओ. तथा पर्यवेक्षक यांची अनुपस्थिती होती. अशा अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील कलम 134 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार तात्काळ गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिले. या बैठकीस तहसीलदार प्रविण पांडे , नितेशकुमार बोलेलू, नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button