हिमायतनगर| तालुक्यातील मौजे दुधड येथील नाफेड खरेदी केंद्रावर ३५ हजार १०५ क्विंटल सोयाबीन ची खरेदी करण्यात आली आहे. अशी माहीती खरेदी केंद्राच्या संचालिका सानिका बंडू पाटील यांनी दिली आहे.


तालुक्यातील दुधड एन. सी. सी. एफ. प्रभाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने साई कृषी देवना फार्मवर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तर्फे सोयाबीन ऑनलाईन शेतकरी होते. २ हजार चारशे त्यापैकी २ हजार तिनशे विस शेतकऱ्यांनी सोयाबीन दिले आहे.

या सोयाबीन खरेदी केंद्रात एकूण खरेदी ३५ हजार एकशे पाच क्विंटल झाली असून ही खरेदी १ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ ची पुर्ण झाली असल्याची माहीती सानिका पाटील यांनी दिली असून या कामी बंडू पाटील दुधडकर, कैलास पाटील दुधडकर, धिरज शिरफूले, समीर धनवे यांनी परिश्रम घेतले आहेत.
