नविन नांदेड l महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय भाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे व्हिजेएनटी ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या हस्ते वदि ४ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा संघटकपदी संतोष बारसे तर नांदेड तालूका अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जाधव यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.


वरील सर्व पदधिकारी यांनी गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात व गावचे सरपंचया पदावर ही त्काम केले असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी पक्षाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी कल्हाळचे सरपंच विठ्ठल पाटील कळके,वाहेगावचे माजी सरपंच लोभाजी गवारे,नांदेड दक्षिण उपाध्यक्ष विजय पांचाळ ,भणगीचे शिवसैनिक ओंकार देशमुख आदींच्या उपस्थितीत पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.


शिवसेना मूख्य सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले ,नियुक्ती पत्रात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार प्रसार कराल व तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन वाढवून कार्य कराल असा विश्वास व्यक्त करूण आपणास पुढील कार्यास शुभेच्छा देतो असा उल्लेख नियुक्ती पत्रात केलेला आहे. या निवडी बद्दल त्यांना राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मित्रमंडळीनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.




