किनवट, परमेश्वर पेशवे। हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती दि.1 जुलै सोमवार रोजी ईस्लापूर येथील राष्ट्रसंत सद्गुरु श्री सेवालाल महाराज चौकात उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कृषी दिन व या जयंतीचे औचित्य साधून इस्लापूर ग्रामपंचायत च्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेतील रोडच्या बाजूने समाज बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रथम स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी गंगाधर राठोड तल्हारीकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषिदिन व स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर पत्रकार ईश्वर जाधव व रवी कसबे यांनी सखोल मार्गदर्शन केले. बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूने वड, पिंपळ ,जांभूळ, कडुलिंब, करंजी बदाम, मोगणी यासह अन्य विविध जातीची झाडे लावून या झाडांना सुरक्षेसाठी जाळ्या देखील लावण्यात आले आहे.


या कार्यक्रमास शिवराम जाधव, मनोज राठोड ,प्रकाश पाटील, ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार ,पत्रकार गौतम कांबळे,गोरसेनेचे कृष्णा राठोड, डॉ. दत्ता राठोड, पगनवाड पोलीस पाटील, संचालक शेख जब्बार, चंद्रकांत आडे, प्रमोद पलीकोंडावार, ग्रा.प. सदस्य प्रशांत डांगे, ब्रम्हानंद बैलवाड ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जिनेवाड, सरपंच प्रकाश राठोड, प्रदीप जिनेवाड, रवी पाटील यांच्यासह सर्व समाज बांधव या जयंती व वृक्षारोपण कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.



