श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे। मागील अनेक दिवसापासून श्रीक्षेत्र माहूरगडाला वळसा घालून वाहणार्या पैनगंगा नदी पाञातून अवैध मार्गाने वाळु तस्करी होत असल्याची संपूर्ण तालुक्यात कुजबुज चालु असतांना माहूर येथील पञकार राजु दराडे हे पैनगंगा नदी पत्रात वृतसंकलन करण्यासाठी गेले असता एका वाळु तस्करानी जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून माहूर पोलीसांनी वाळु तस्कराविरुध्द गुन्हा नोंद केल्याची माहीती प्राप्त झाली असून या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटना माहूर/किनवट कडून करण्यात आली आहे.

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजु दराडे हे वृत्त संकलनासाठी पैनगंगा नदी पाञात गेले असता एका वाळु चोरट्याने दराडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे. या बाबत पञकार राजु दराडे यांनी व युवा ग्रामिण पञकार संघटनेच्या वतीने माहूर पोलीस प्रशासनासह उपविभागीय अधिकारी किनवट यांना तर महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नांदेड, मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र राज्य,विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर,जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड यांना सादर करण्यात आले असून सदरील घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटना माहूर/किनवट कडून करण्यात आली आहे.तर पञकार राजु दराडे यांना धमकी देणाऱ्या प्रविण चोले यांच्या विरोधात माहूर पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.

माहूर महसुल प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी जावून अवैध वाळु तस्कारा विरोधात धडक कार्यवाह्या केल्या परंतु असे असतांना अवैध वाळु तस्करीतील मोरक्या माञ मोकाट असल्याने दररोज काही ना काही घटना घडत आहेत.तालुक्यातील वडसा येथील नागोबा घाटावर देखील असाच काहीसा प्रकार घडला असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.परंतु महसुल व पोलीस प्रशासनाला याची जरा देखील चाहूल लागली नसल्याने अनेकाना याचे आश्चर्य वाटत आहे.ऐवढेच नाही तर वाई बाजारसह परिसरात याच घाटावरुण आज देखील अवैध मार्गाणे वाळु येत असल्याचे अनेक पुरावे जिवंत आहे. माञ महसुल प्रशासनानसह उपविभागीय अधिकारी याकडे का दुर्लक्ष करीत आहे. यावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.
